शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा जिंकण्यासाठी सज्ज रहा : भाजप प्रदेशाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:55 IST

शिवसेनेबरोबर युती होईल की नाही, उमेद्वार कोण असेल, याविषयात अधिक काळ लक्ष न घालता पक्ष देईल, त्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.

ठळक मुद्देलोकसभा जिंकण्यासाठी सज्ज रहा  भाजप प्रदेशाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कोल्हापूर : शिवसेनेबरोबर युती होईल की नाही, उमेद्वार कोण असेल, याविषयात अधिक काळ लक्ष न घालता पक्ष देईल, त्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. दि. २४ जानेवारीला कोल्हापूर-सांगली दौऱ्यावर येणाऱ्या राष्ट्रीय  अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताप्रीत्यर्थ विमानतळ ते अंबाबाई मंदिर अशी पाच हजार कार्यकर्त्यांची दुचाकी रॅली काढण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील बुथप्रमुख, विस्तारक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांची आढावा बैठक सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात पार पडली, त्यावेळी दानवे बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, संघटन मंत्री विजयराव पुराणिक, मकरंद देशपांडे, रवी आनासपुरे, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई उपस्थित होते.भाजपचे मंडल अध्यक्ष, विस्तारक यांना रावसाहेब दानवे यांनी विविध प्रश्न विचारून त्यांच्याकडून पक्षाने लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात केलेल्या तयारीची माहिती जाणून घेतली. दानवे यांच्यासह विजयराव पुराणिक यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

लोकसभा मतदारसंघातील तयारी, तेथील सध्याची परिस्थिती, पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी, आदी संघटनात्मक बाबींवर अधिक चर्चा झाली. शेवटी दानवे यांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, आपल्याला नेमून दिलेले कार्य प्रामाणिकपणे पार पाडा, असे आवाहन केले.

अमित शहा २४ जानेवारीस कोल्हापुरातलोकसभेच्या कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा या चार मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक २४ जानेवारीला सांगली येथे होत आहे. या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. या दिवशी सकाळी विशेष विमानाने अमित शहा कोल्हापूरला येणार आहेत.

यावेळी विमानतळ ते अंबाबाई मंदिर अशी दुचाकीची रॅली काढण्यात येईल. सुमारे पाच हजारांवर कार्यकर्ते या रॅलीत सहभागी व्हावेत, अशी अपेक्षा रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. प्रमुख कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत एक बैठक व स्नेहभोजन व पत्रकार परिषद, असे शहा यांचे कोल्हापुरातील कार्यक्रम असल्याचे दानवे यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात भाजप कार्यकर्ते, मंडल अध्यक्ष, विस्तारक यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी संदीप देसाई, महेश जाधव, आमदार सुरेश हाळवणकर, समरजितसिंह घाटगे, विजय पुराणिक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मकरंद देशपांडे, रवी आनासपुरे उपस्थित होते.

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर