थेट पाइपलाइनची श्वेतपत्रिका काढण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:54+5:302021-06-20T04:17:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या थेट पाइपलाइन योजनेसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढण्याची आमची तयारी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस, ...

Ready to remove the pipeline white paper directly | थेट पाइपलाइनची श्वेतपत्रिका काढण्यास तयार

थेट पाइपलाइनची श्वेतपत्रिका काढण्यास तयार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या थेट पाइपलाइन योजनेसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढण्याची आमची तयारी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी पत्रकातून दिली. या योजनेचे ८० टक्के काम पूर्णत्वाला आले असून, याची खातरजमा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप व ताराराणी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त कमिटी करण्याचीही आमची तयारी असल्याचे म्हटले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी २०१५ साली परवानगी मागितली होती. मात्र, प्रत्यक्षात ती २०१८ साली मिळाली. वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या विभागाने या योजनेच्या कामावरील यंत्रसामग्री जप्त केली होती, तसेच कोरोना महामारीमुळे कर्फ्यू होता, त्यामुळे सर्वच कामे बंद होती.

दरम्यान, शहराच्या थेट पाइपलाइन योजनेबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून कोल्हापूरवासीयांची जाहीर माफी मागितली. यामध्ये चूक काय, असा सवाल माजी महापौर आर. के. पोवार, निलोफर आजरेकर, राजेश लाटकर, आदिल फरास, शारंगधर देशमुख, संजय मोहिते, सचिन पाटील, सुनील पाटील, दिलीप पोवार, विनायक फाळके, उत्तम कोराने, अजित राऊत, नियाज खान आदींनी पत्रकातून केला आहे.

चौकट

१०० टक्के निधी खात्यावर जमा आहे........

थेट पाइपलाइन योजनेच्या निधीचे शंभर टक्के पैसे महापालिकेच्या खात्यावर जमा आहेत. ॲडव्हान्समध्ये पैसे जमा असणारा कदाचित हा राज्यासह देशातील पहिलाच प्रकल्प असेल, असेही या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Ready to remove the pipeline white paper directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.