शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

Corona vaccine -लस घेतल्यानंतर ३८ जणांना रिॲक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 11:13 IST

Corona vaccine -कोल्हापूर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीची टोचणी सुरू असून, यामुळे ३८ जणांना रिॲक्शन आल्याचे सांगण्यात आले; परंतु या सर्वांची प्रकृती आता ठणठणीत असून, कोणीही घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलस घेतल्यानंतर ३८ जणांना रिॲक्शनताप, डोकेदुखी, मळमळ, न घाबरण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीची टोचणी सुरू असून, यामुळे ३८ जणांना रिॲक्शन आल्याचे सांगण्यात आले; परंतु या सर्वांची प्रकृती आता ठणठणीत असून, कोणीही घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यातील ११ केंद्रांवर १६ जानेवारीपासून लसीकरण केले जात आहे. हे लसीकरण केवळ शासकीय आरोग्य सेवेमध्ये काम करणाऱ्यांना केले जात आहे; परंतु अजूनही या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पूर्णपणे प्रतिसाद मिळालेला नाही. आता लसीकरणासाठी आणखी ९ केंद्रे वाढविण्यात आली आहेत.२३ जानेवारी अखेरपर्यंत ५५०० जणांना ही लस देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, त्यापैकी केवळ ३५०१ जणांनी लस टोचून घेतली आहे. त्यापैकी ३४ जणांना रिॲक्शन झाली आहे. यातील काही जणांना ताप आला, काहींचे डोके दुखायला सुरुवात झाली, तर काहींना मळमळायला लागले; परंतु हा त्रास काही तासांपुरताच असून, आता या सर्वांची तब्येत ठीक असल्याचे सांगण्यात आले.सुरुवातीच्या काळातील ११ केंद्रांनंतर आता ग्रामीण भागात ८ आणि कोल्हापुरात १ केंद्र वाढविण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई नागरी आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, मलकापूर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली, जयसिंगपूर या नव्या आरोग्य संस्था वाढविण्यात आल्या आहेत.या आठवड्यामध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवार या तीन दिवशी लसीकरण करण्यात येणार आहे. शनिवारीही लसीकरण करण्यात येणार होते. मात्र, ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम असल्यामुळे ३० तारखेचे लसीकरण होणार नाही. मात्र, त्यानंतरच्या शनिवारी लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे.उद्दिष्टाच्या १३ टक्केच कामकोल्हापूर जिल्ह्यात अजूनही एकूण लसीकरणाच्या उद्दिष्टाच्या केवळ १२ टक्के काम झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील २२४१६, कोल्हापूर महापालिका आरोग्य विभागाकडील ११४६१, अशा एकूण ३३ हजार ८७७ आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ४५९८ जणांना सोमवारअखेर लस टोचण्यात आली आहे. १३.५७ टक्के लसीकरण आतापर्यंत झाले आहे.

लसीकरणाबाबत कुणीही मनामध्ये शंका घेऊ नये. आमच्यासारख्या ५०० हून अधिक वैद्यकीय अधिकऱ्यांनी आतापर्यंत लस घेतली आहे. अगदी कमी जणांना थोडा त्रास झाला आहे; परंतु तो काही तासांसाठी झाला आहे. आता या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणत्याही शंकाकुशंका मनात न घेता लस टोचून घ्यावी.-डॉ. योगेश साळेजिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूरHealthआरोग्य