शासनाच्या योजना सामान्यापर्यंत पोहोचवा : संध्यादेवी कुपेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:17 IST2021-07-16T04:17:24+5:302021-07-16T04:17:24+5:30

गडहिंग्लज पंचायत समितीच्या नूतन उपसभापती इंदू नाईक यांनी संध्यादेवींच्या हस्ते फीत कापून आपल्या दालनात प्रवेश केला. यावेळी त्या बोलत ...

Reach out to the common man: Sandhyadevi Kupekar | शासनाच्या योजना सामान्यापर्यंत पोहोचवा : संध्यादेवी कुपेकर

शासनाच्या योजना सामान्यापर्यंत पोहोचवा : संध्यादेवी कुपेकर

गडहिंग्लज पंचायत समितीच्या नूतन उपसभापती इंदू नाईक यांनी संध्यादेवींच्या हस्ते फीत कापून आपल्या दालनात प्रवेश केला. यावेळी त्या बोलत होत्या. सभापती रूपाली कांबळे, राज्य मजूर फेडरेशनचे संचालक उदय जोशी, गटविकास अधिकारी शरद मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संध्यादेवी म्हणाल्या, राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यामुळेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के जागा मिळाल्या. यातूनच बेरड रामोशी या उपेक्षित समाजातील इंदूताईंना उपसभापतिपदाचा बहुमान मिळाला, याचा मनस्वी आनंद झाला.

यावेळी विजयराव पाटील, इराप्पा हसुरी, विद्याधर गुरबे, श्रीया कोणकेरी, बनश्री चौगुले, उत्तम नाईक, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे नूतन उपसभापती इंदू नाईक यांचा संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. यावेळी सभापती रूपाली कांबळे, गटविकास अधिकारी शरद मगर, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, श्रीया कोणकेरी, बनश्री चौगुले, आदी उपस्थित होते.

क्रमांक : १५०७२०२१-गड-०३

Web Title: Reach out to the common man: Sandhyadevi Kupekar