तालुक्यांमध्ये कोविड काळजी केंद्रे पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:20 IST2021-04-03T04:20:53+5:302021-04-03T04:20:53+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुन्हा सर्व तालुक्यांमधील कोविड काळजी केंद्रे त्वरित ...

तालुक्यांमध्ये कोविड काळजी केंद्रे पुन्हा सुरू
कोल्हापूर : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुन्हा सर्व तालुक्यांमधील कोविड काळजी केंद्रे त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील बारा केंद्रे सुरू करण्यात येणार असून त्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. गतवर्षीचा अनुभव पाहता बेड उपलब्धतेची गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी आत्ताच कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तालुकास्तरीय समितीकडून या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून केंद्रांच्या व्यवस्थापनासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
--
तालुका : केंद्राचे नाव : एकूण बेड : ऑक्सिजन बेड : ऑक्सिजन नसलेले बेड
आजरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह : ८० : २० : ६०
भुदरगड : ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी : २०० : ५० : १५०
चंदगड : प्राथमिक आरोग्य केंद्र कानूर खुर्द : ३० : १० : २०
गडहिंग्लज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह शेंद्रीमाळ : ८१ : १० : ७१
ग़डहिंग्लज : प्राथमिक आरोग्य केंद्र, कानेवाडी : २० : ५ : १५
करवीर : विद्यानिकेतन, शिंगणापूर : ५५ : २७ : २८
कागल : कागल चेकपोस्ट : २४० : ४० : २००
पन्हाळा : प्राथमिक आरोग्य केंद्र, पोर्ले : ४० : ६ : ३४
शाहूवाडी : प्राथमिक आरोग्य केंद्र, माण : १८ : ६ : १२
राधानगरी : ग्रामीण रुग्णालय : ३० : १० : २०
शिरोळ : कुंजवन, उदगाव : १२५ : ४८ : ७७
हातकणंगले : ग्रामीण रुग्णालय, पारगाव : ४० : १५ : २५
एकूण : ९५९ : २४७ : ७१२
--