जिल्ह्यातील सव्वादोन लाख ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:06 PM2021-07-29T13:06:22+5:302021-07-29T13:12:44+5:30

Mahavitran Flood Kolhapur : महापुराच्या आपत्तीने खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या यंत्रणेने अहोरात्र काम करून अल्पावधीत पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश पडला आहे. पूरबाधित गावांपैकी २०६ गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असून अजून १५ गावे पूर्णत: व ३७ अंशत: बाधित गावांतील वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.

Re-lighting in the homes of 12 lakh customers in the district | जिल्ह्यातील सव्वादोन लाख ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश

महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील खंडीत झालेली वीजसेवा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. खंडीत झालेली आंबेवाडी येथील वीजसेवा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत आहेत. (छाया : रोहित कांबळे )

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील सव्वादोन लाख ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाशमहावितरणचे अहोरात्र काम : पूरग्रस्त २०६ गावांचा पुरवठा पूर्ववत

कोल्हापूर : महापुराच्या आपत्तीने खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या यंत्रणेने अहोरात्र काम करून अल्पावधीत पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश पडला आहे. पूरबाधित गावांपैकी २०६ गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असून अजून १५ गावे पूर्णत: व ३७ अंशत: बाधित गावांतील वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.

महापुरामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिवाची बाजी लावून कर्मचारी पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. वीज नसल्याने गावगाड्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळावी, याकरिता पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करण्याबाबत प्राधान्य देण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांनी दिल्या होत्या. तसेच आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळाचाही पुरवठा केला होता. सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील ग्राहकांच्या भेटी घेऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यातील अडचणी व नेमका किती कालावधी लागू शकतो, ही वस्तुस्थिती ग्राहकांना अवगत करावी, असे सूचित केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील चार उपकेंद्रे (गांधीनगर, थावडे, आवाडे मळा, शिरदवाड) बंद आहेत. अद्याप १५ गावे पूर्णत: व ३० गावे अंशत: तेथील ३७ हजार ६३० घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजपुरवठा सुरळीत होणे बाकी आहे. १०१ वीजवाहिन्या पूर्ववत केल्या असून सात वीजवाहिन्या बंद आहेत. २८६५ वितरण रोहित्रे पूर्ववत केली असून अजून ४२६ बंद आहेत. उच्चदाब वीजवाहिनीचे १३६ व लघुदाब वाहिनीचे २१० वीज खांब पडले आहेत. नागाळा पार्क, पाटपन्हाळा व शिरटी या उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे.

Web Title: Re-lighting in the homes of 12 lakh customers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.