शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळच्या दुबार ठरावांवर पुन्हा सुनावणी, सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:33 IST

Gokul Milk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी सोमवारी (दि. १५) प्रसिद्ध होणार आहे. दुबार ठरावावर यापूर्वी सुनावणी होऊन निकालही दिला होता. मात्र, दुबार ठरवासह प्रारूप याद्यांवर येणाऱ्या हरकतीवर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देगोकुळच्या दुबार ठरावांवर पुन्हा सुनावणी सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी सोमवारी (दि.१५) प्रसिद्ध होणार आहे. दुबार ठरावावर यापूर्वी सुनावणी होऊन निकालही दिला होता. मात्र, दुबार ठरावासह प्रारूप याद्यांवर येणाऱ्या हरकतींवर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे. १२ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, साधारणपणे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

गोकुळ’साठी १५ डिसेंबर २०१९ रोजी संस्था प्रतिनिधींच्या नावांचे ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. २२ जानेवारी २०२० अखेर ३,७६४ ठराव दाखल झाले होते. प्रत्यक्षात संस्थांपेक्षा १०५ ठराव जादा दाखल झाले होते. या दुबार ठरावांवर सहायक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये सुनावणीदरम्यानच सात संस्थांमध्ये समझोता झाला होता.

उर्वरित ठिकाणी अध्यक्ष, सचिव एकीकडे, तर संचालक दुसरीकडे, असे चित्र होते, तर काही संस्थांमध्ये दोन सचिवांबरोबर दोन प्रोसेडिंग असल्याचे पेच निर्माण झाला होता. त्यावर सुनावणी होऊन ३,६५९ प्रतिनिधींचे नावे निश्चित केली होती. ही प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती, तोपर्यंत निवडणुकांची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली.

आता नव्याने प्रक्रिया सुरू झाली असून, सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. दुबार ठरावांचा समावेशही या यादीत राहणार असून, दुबार ठरावांसह प्रारूप यादीवर येणाऱ्या हरकती घेता येणार आहेत.तालुका          दुबार ठराव संख्या

  • आजरा ४
  • करवीर १३
  • कागल ७
  • गगनबावडा १
  • गडहिंग्लज ११
  • पन्हाळा १७
  • भुदरगड १८
  • राधानगरी २७
  • शाहूवाडी ४
  • हातकणंगले १
टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर