शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने केक कापणाऱ्या आरसी गँगच्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 14:00 IST

सुभाषनगर हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरसी गँगच्या आणखी दोघांना राजारामपुरी पोलीसांनी मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्देतलवारीने केक कापणाऱ्या आरसी गँगच्या दोघांना अटकसुभाषनगरातील प्रकार : रवी शिंदेसह सहाजणांचा शोध सुरू

कोल्हापूर : सुभाषनगर हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरसी गँगच्या आणखी दोघांना राजारामपुरी पोलीसांनी मंगळवारी अटक केली.

संशयित योगेश मानसिंग पाटील (वय २८, रा. पाटील वसाहत, मंगळवार पेठ), जावेद इब्राहीम सय्यद (३०, रा. जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. या गँगचा म्होरक्या संशयित रवी सुरेश शिंदे, रणजित मारुती कांबळे यांच्यासह साथीदार प्रकाश कांबळे, संदीप गायकवाड, सागर प्रभुदास व्हटकर, सागर सोनवणे (सर्व रा. सुभाषनगर) यांना अद्याप अटक झालेली नाही. ते पसार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.सुभाषनगरमध्ये राहणारा केदार सातपुते याचा ३१ मार्चला वाढदिवस होता. तो आरसी गँगचा कार्यकर्ता असल्याने सुभाषनगर येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी संशयितांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता.

यापूर्वी संशयित अमित अंकुश बामणे, गणेश पंडित बामणे, साई संभाजी कांबळे, सनी राम साळे, शुभम दीपक मुळीक, केदार सातपुते (सर्व रा. सुभाषनगर) यांना अटक केली. योगेश पाटील व जावेद सय्यद यांना त्यांच्या घरातुन पोलीसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.

मोक्का कारवाई अंतिम टप्प्यातरवी शिंदे, रणजित कांबळे, अमित बामणे, सनी साळे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, हाणामारी, खंडणीचे ३० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना हद्दपारही केले होते. असे असतानाही त्यांनी शहरात येऊन मित्राचा वाढदिवस साजरा केला होता. आरसी गँगवर संघटित गुन्हेगारीबद्दल मोक्का कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही या गँगच्या विरोधात प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजारामपुरी पोलिसांनी प्रस्ताव तयार केला आहे. मोक्का कारवाई अंतिम टप्प्यात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर