कसाब मस्जिद येथे रोजा इफ्तारची लगबग औरच!

By Admin | Updated: July 7, 2014 00:56 IST2014-07-07T00:56:30+5:302014-07-07T00:56:52+5:30

प्रायमरी अरबी शिक्षणासाठी ‘मकतब’ : नमाज पठण करणाऱ्यांची संख्या अधिक

Raza Iyather's stay at the Kasab Mosque! | कसाब मस्जिद येथे रोजा इफ्तारची लगबग औरच!

कसाब मस्जिद येथे रोजा इफ्तारची लगबग औरच!

कोल्हापूर : इब्राहिम खाटीक चौकात दोन मजली आकर्षक अशी कसाब मस्जिद उभारली आहे. चौकात संध्याकाळी रोजा इफ्तारची लगबग काही औरच पाहावयास मिळते. विविध प्रकारचे खाद्य स्टॉलवरील स्वादिष्ट व रुचकर पदार्थ येथे मुस्लिम बांधवांना सहज उपलब्ध होतात. यामुळे खवय्यांना भुरळ घालणारा हा इफ्तार फेस्टिव्हल ठरला आहे. कसाब मस्जिदचे संस्थापक सुलतान म्हेत्तर कसाई यांनी आपली जागा मस्जिदसाठी दान (वक्त) केली. येथे २४ जुलै १८८२ मध्ये मस्जिद उभारण्यात आली. पूर्वी ही मस्जिद छोटी होती. पुढे मस्जिद कमी पडू लागल्याने १९५५ मध्ये मस्जिदच्या पाठीमागील जागेत बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम दगडी करण्यात आले आहे. १९८२ मध्ये मस्जिदच्या समोरील व दुसऱ्या मजल्याचे आरसीसी बांधकाम करण्यात आले आणि पै. इब्राहिम खाटीक चौकात एक आकर्षक व मोठी कसाब मस्जिद साकारली. मस्जिदमध्ये नमाज पठण व तरावीह पठणाचे कार्य मौलाना इरफान कास्मी व हाफीज इम्रान कास्मी करत आहेत. मस्जिदमध्ये चांगल्याप्रकारे वजूखाना तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या नमाजींची संख्या अधिक आहे. या मस्जिदतर्फे रोजा इफ्तारची व्यवस्था मस्जिदच्या टेरेसवर केली जाते. मस्जिदमध्ये मुलांना पवित्र कुरआन शरीफचे पठण करता यावे यासाठी प्रायमरी अरबी शिक्षण मिळावे यासाठी ‘मकतब’ घेतला जातो.

Web Title: Raza Iyather's stay at the Kasab Mosque!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.