शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध, तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 11:59 IST

कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची व रंगतदार होणार

सदाशिव मोरेआजरा : आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. कोरोनामुळे कारखान्याची निवडणूक दोन वर्षे पुढे ढकलली आहे. कच्च्या मतदार यादीवर ११ मे पर्यंत हरकती दाखल तर त्यावर २२ मे पर्यंत निर्णय दिला जाणार आहे. कारखान्याची गटनिहाय निवडणूक होणार असून २१ संचालक निवडले जाणार आहेत. तालुका संघापाठोपाठ साखर कारखान्याची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.आज प्रसिद्ध झालेल्या कच्च्या मतदार यादीनुसार कारखान्याचे २५  हजार १८१ अ वर्ग व्यक्ती सभासद, १६५ पैकी ठराव प्राप्त १२० संस्था सभासद तर ७४३८  ब वर्ग सभासद आहेत. संचालक मंडळाची मे २०२१ मध्ये मुदत संपली तरी कोरोनामुळे दोन वर्षे मुदतवाढ मिळाली आहे. सन २०२३  ते २८ या पंचवार्षिकसाठी गटनिहाय निवडणूक होणार आहे. पाच गटातून - १५,  महिला - २,  इतर मागास - १, अनुसूचित जाती - १,  भटक्या विमुक्त जाती - १ व ब वर्ग - १ असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. हरकती स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून १५ दिवसांच्या आत अंतिम मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणूक जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे निवडणूक विभागाचे नियोजन आहे.पण जुलैमध्ये प्रचंड पाऊस असल्याने या कालावधीत निवडणूक होणार की पुढे ढकलणार याबाबत संदिग्धता आहे. तालुक्यातील जनता बँक, स्वामी विवेकानंद पतसंस्था यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मात्र तालुका संघात  बिनविरोधाला ब्रेक लागणार असून संघाबरोबर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची व रंगतदार होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक