‘शिवकुमार’च्या उपचारासाठी धावली ‘रवळनाथ’

By Admin | Updated: December 11, 2014 00:03 IST2014-12-10T19:58:32+5:302014-12-11T00:03:36+5:30

शस्त्रक्रियेसाठी मदत : ‘रवळनाथ हौसिंग फायनान्स’कडून दहा हजारांचा धनादेश--लोकमत इनिसिटीव्ह

'Ravvantnaath' ran for the treatment of Shivakumar | ‘शिवकुमार’च्या उपचारासाठी धावली ‘रवळनाथ’

‘शिवकुमार’च्या उपचारासाठी धावली ‘रवळनाथ’

गडहिंग्लज : चंदगड येथे तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या येथील शिवकुमार अजित गवळी या विद्यार्थ्याच्या उपचारासाठी आजऱ्याच्या श्री. रवळनाथ को-आॅप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे दहा हजारांची मदत देण्यात आली.
गतवर्षी जूनमध्ये मित्रांसोबत फिरायला गेला असताना हा अपघात झाला. अपघातामुळे ६७ टक्क्यांंनी दहावी उत्तीर्ण होऊनदेखील त्याला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेता आलेला नाही. ११ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्या शिक्षणासाठी आई मोलमजुरी करते. अपघातात त्याच्या मेंदू व पोटाला गंभीर दुखापत झाल्यामुळे लोकांनी वर्गणी काढून त्याच्यावर सुमारे चार लाख रुपये खर्चाच्या दोन शस्त्रक्रिया बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये केल्या. शस्त्रक्रियेवेळी त्याच्या मेंदूच्या कवटीचा काही भाग बाजूला काढून ठेवण्यात आला आहे.
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तो हिंडू-फिरू लागला आहे. मात्र, काढून ठेवलेला कवटीचा भाग बसविण्यासाठी पुन्हा एका शस्त्रक्रियेची गरज असून, त्यासाठी आणखी एक लाखाची आवश्यकता आहे. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने ८ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपण्यात नेहमी पुढे असणाऱ्या ‘रवळनाथ’ने शिवकुमारच्या उपचारासाठी त्याची आई पूजा यांना दहा हजारांची मदत दिली.
‘रवळनाथ’च्या गडहिंग्लज शाखा कार्यालयात शाखाध्यक्ष प्रा. जे. बी. केसरकर यांच्या हस्ते पूजा
यांनी धनादेश स्वीकारला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, शाखा सल्लागार प्रा. एम. एस. मरजे, सुभाष हेब्बाळे, गजानन गिजवणेकर, एकनाथ केसरकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Ravvantnaath' ran for the treatment of Shivakumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.