रवींद्र कौशिक ई-लायब्ररी आदर्शवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:49+5:302021-09-26T04:26:49+5:30

बेळगाव : विस्मरणात गेलेल्या देशभक्तांचे स्मरण करून देणारी देशभक्त रवींद्र कौशिक यांच्या नावाची ही ई-लायब्ररी आदर्शवत आहे, असे ...

Ravindra Kaushik e-library ideally | रवींद्र कौशिक ई-लायब्ररी आदर्शवत

रवींद्र कौशिक ई-लायब्ररी आदर्शवत

बेळगाव : विस्मरणात गेलेल्या देशभक्तांचे स्मरण करून देणारी देशभक्त रवींद्र कौशिक यांच्या नावाची ही ई-लायब्ररी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केले.

शहरातील एसपीएम रोड शहापूर येथील रवींद्र कौशिक ई-लायब्ररी येथे ते बोलत होते. ही ई-लायब्ररी म्हणजे आपल्या तरुणपणातील उमेदीची २६ वर्षे देशसेवेसाठी खर्च केलेल्या रवींद्र कौशिक यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. या ई-लायब्ररीचे उद्घाटन उद्या रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्यासाठी रवींद्र कौशिक यांचे कुटुंबीय खास जयपूर येथून बेळगाव दाखल झाले आहेत. २.५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लायब्ररीमध्ये कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू अशा पाच भाषेतील डिजिटल ग्रंथालय उपलब्ध आहे, अशी माहितीही आमदार पाटील यांनी दिली.

फोटो;बेळगावातील हायटेक ई लायब्ररी

फोटो: आमदार अभय पाटील ई-लायब्ररी दाखवताना डी सी एम जी हिरेमठ आदी.

Web Title: Ravindra Kaushik e-library ideally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.