राऊतवाडी धबधबा प्रवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:11+5:302021-06-18T04:17:11+5:30
आठवडाभर तुरळक स्वरुपात असलेल्या पावसाने दोन दिवसापासून उग्र रूप धरण केले आहे. राधानगरी धरण स्थळी सकाळी २२० मिमी पावसाची ...

राऊतवाडी धबधबा प्रवाही
आठवडाभर तुरळक स्वरुपात असलेल्या पावसाने दोन दिवसापासून उग्र रूप धरण केले आहे. राधानगरी धरण स्थळी सकाळी २२० मिमी पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठा गुरूवारी एकाच दिवशी ०.३२ टीमसीने वाढला. त्यामुळे परिसरातील सर्व ओढे-नाले व त्यावरील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला येथील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा बुधवारपासून कोसळू लागला. सुमारे दीडशे फुटावरून दरीत कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा प्रपात व त्यातून उडणारे तुषार अनुभवणे व झेलण्यासाठी दरवर्षी येथे प्रचंड गर्दी होते. मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षीही अजून कोरोनाचे निर्बंध असल्याने पर्यटकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
फोटो ओळ -दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील सर्वच धबधबे ओसंडत आहेत. प्रसिद्ध राऊतवाडी येथील धबधब्याचे हे रूप