राऊ पाटील निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:08+5:302021-07-24T04:16:08+5:30

मलकापूर : शाहूवाडी तालुक्याचे माजी आमदार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व कौन्सिल सदस्य, पेरीड गावचे माजी सरपंच ...

Rau Patil passed away | राऊ पाटील निधन

राऊ पाटील निधन

मलकापूर : शाहूवाडी तालुक्याचे माजी आमदार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व कौन्सिल सदस्य, पेरीड गावचे माजी सरपंच राऊ धोंडी पाटील (वय ९२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने वीज दरवाढ, शेती मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. शाहूवाडी तालुक्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गर्ल्स हायस्कूल, हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालय काढून त्यांनी सर्वसामान्य विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष परिश्रम घेतले होते. आमदारकीच्या काळात त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठीही विशेष योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

रक्षाविसर्जन रविवार, दि. २५ जुलैरोजी प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, पेरीड येथे आहे.

फोटो २३ राऊ धोंडी पाटील, माजी आमदार

Web Title: Rau Patil passed away