रत्नागिरी युवा सेनेची राज्यातील पहिली वेबसाइट

By Admin | Updated: July 25, 2014 22:54 IST2014-07-25T22:46:55+5:302014-07-25T22:54:50+5:30

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी व इंग्रजी भाषेतील

Ratnagiri Yuva Sena's first website in the state | रत्नागिरी युवा सेनेची राज्यातील पहिली वेबसाइट

रत्नागिरी युवा सेनेची राज्यातील पहिली वेबसाइट

रत्नागिरी : राज्यात युवा सेनेची पहिली वेबसाइट सुरू करण्याचा मान रत्नागिरीच्या युवासेनेला मिळणार आहे. २७ जुलै रोजी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी व इंग्रजी भाषेतील ६६६.८४५ं२ील्लं१ं३ल्लँ्र१्र.ूङ्मे या वेबसाईटचे उदघाटन होणार आहे. याबाबत युवासेनेच्या पत्रकार परिषदेत आज माहिती देण्यात आली.
युवासेनेचे तुषार साळवी यांच्या संकल्पनेतून ही वेबसाइट तयार करण्यात आली असून बेरोजगारासाठी नोंदणी, रोजगार देणाऱ्या कंपन्यांची माहिती अपलोड करण्याची सुविधा या वेबसाइटवर आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याची तालुकावार मराठीत विस्तृत माहिती यावर आहे. युवा सेनेचे विविध उपक्रमही यावर दिसणार आहेत. तक्रारी देण्यासाठी विशेष सुविधा असून त्या विभागातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या तक्रारी, समस्या सोडवावयाच्या आहेत. वेबसाइटवर फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस, यू ट्युब यांच्या लिंक देण्यात आल्या आहेत. या वेबसाइटचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Ratnagiri Yuva Sena's first website in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.