रत्नागिरी, सांगली पुढील फेरीत

By Admin | Updated: November 25, 2015 00:54 IST2015-11-25T00:51:27+5:302015-11-25T00:54:06+5:30

राज्यस्तरीय कबड्डी : मुलींमध्ये सिंधुदुर्ग, नाशिकची सरशी

Ratnagiri, Sangli in the next round | रत्नागिरी, सांगली पुढील फेरीत

रत्नागिरी, सांगली पुढील फेरीत

सावंतवाडी : येथील जिमखाना मैदानावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या राज्य मान्यतेने सुरू असलेल्या कुमार व कुमारी गट अजिंंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात किशोर गटात मुंबई शहर संघाने नांदेड संघावर ५८-२४, तर सांगली संघाने नाशिक संघावर ४७-१५ अशी मात केली. रत्नागिरी संघाने लातूर संघावर १९-०७ गुणफरकांनी विजय मिळविला. कोल्हापूर संघाने हिंगोली संघाला २६-०७ असे नमवत पहिल्या सामन्यातील उणीव भरून काढत आघाडी घेतली. तसेच किशोरी गटात यजमान सिंधुदुर्ग संघाने उस्मानाबाद संघावर ३२-२६ अशी, तर नाशिक संघाने नांदेड संघावर ५५-६ अशी एकतर्फी मात केली. दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात किशोर गटात मुंबई शहर संघाने नांदेड संघावर ५८-२४ अशी मात करीत आपली विजयी घोडदौड अखंडित ठेवली. मध्यंतराला मुंबई शहर संघाकडे ३९-०७ अशी भक्कम आघाडी होती. नांदेडच्या प्रकाश जाधव, अंकुश आडे यांनी चांगला खेळ केला. मुंबई उपनगर संघाने जालना संघावर ४५-०९ अशी मात करीत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. सामन्यात सुरुवातीपासूनच उपनगर संघाने जालना संघावर आक्रमण केले. सांगलीने नाशिकवर ४७-१५ अशी मात करीत आपली वाटचाल सुरू ठेवली. मध्यंतराला सांगली संघाकडे १५-०५ अशी आघाडी होती. सांगलीच्या कृष्णा मदने याने केलेल्या खोलवर चढाया व सुरेश कडलगे यांनी घेतलेल्या पकडींच्या जोरावर हा विजय मिळविला. रत्नागिरी संघाने लातूर संघावर १९-०७ असा विजय मिळविला. मध्यंतरानंतर रत्नागिरी संघाने आक्रमक खेळ करीत सुरेख पकडी घेत विजय खेचून आणला. कोल्हापूर संघाने हिंगोली संघाला २६-०७ असे नमवित विजय मिळविला. मध्यंतराला कोल्हापूर संघाकडे १४-४ अशी दहा गुणांची आघाडी होती. कोल्हापूरच्या सतीश ऐनवडे व अभिषेक गावडे यांनी चांगला खेळ केला, तर त्यांना जितेंद्र चव्हाण याने काहीसा प्रतिकार केला. पुणे संघाने नगर संघावर ४३-१३ अशी मात करीत सहज विजय मिळविला. (वार्ताहर)

किशोरी गटात तुल्यबळ लढती
किशोरी गटात यजमान सिंधुदुर्ग संघाने उस्मानाबाद संघावर ३२-२६ अशी सहा गुणांनी मात करीत विजय मिळविला.
नाशिक संघाने नांदेड संघावर ५५-६ असा एकतर्फी विजय मिळविला. नाशिकच्या अश्विनी गायकवाड व मानसी वाझट यांनी चांगला खेळ केला.
रायगड संघाने औरंगाबाद संघाचा ६६-८ असा धुव्वा उडवित धूळ चारली.
पालघर संघाने कोल्हापूर संघाचा ३७-२२ असा पराभव केला.

Web Title: Ratnagiri, Sangli in the next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.