रेशन दुकानदारांना प्रतिकार्डमागे पाच रुपये

By Admin | Updated: April 3, 2015 23:55 IST2015-04-03T22:49:01+5:302015-04-03T23:55:42+5:30

माहिती संकलनासाठी अनुदान : राज्य सरकारकडून सुमारे १७९ कोटींची तरतूद

Ration shoppers have to pay Rs | रेशन दुकानदारांना प्रतिकार्डमागे पाच रुपये

रेशन दुकानदारांना प्रतिकार्डमागे पाच रुपये

प्रवीण देसाई -कोल्हापूर -रेशनकार्डची माहिती संकलन करणाऱ्या रेशन दुकानदारांसह संबंधित यंत्रणेला प्रतिकार्डमागे पाच रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी सुमारे १७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यभरातील दुकानदारांकडून शासकीय यंत्रणेला होत असलेल्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या महिन्यात याचे वितरण शक्य आहे.
राज्यात अन्न सुरक्षा योजना सुरू आहे. त्याअंतर्गत राज्य शासनाने बारकोडेड संगणकीकृत रेशनकार्डवर प्रमुख महिलेच्या नावे व फोटोसह कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या समावेशासह देण्याचा व रेशन दुकानांतून शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून करण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनकार्डधारकांना संगणकीकृत रेशनकार्ड देण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक यासह अन्य माहिती संकलित केली जात आहे. ही माहिती संकलित करण्यासाठी शहरी भागात दुकानदारांचा ऐच्छिक सहभाग घेऊन त्यांना प्रत्येक रेशनकार्डची माहिती संकलित करण्यासाठी प्रति कार्डमागे म्हणजे ग्राहकांकडून भरण्यात येणाऱ्या फॉर्ममागे पाच रुपये मानधन देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे तसेच ग्रामीण भागात प्रामुख्याने रेशन दुकानदारांसह इतरही माहिती संकलित करणाऱ्या यंत्रणेना हे मानधन देण्यात येणार आहे.
सध्या संगणकीय रेशनकार्डसाठी माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती संगणकीय प्रणालीद्वारे भरण्याचे कामही सुरू आहे. घरातील वरिष्ठ महिलेच्या नावे रेशनकार्ड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक रेशन दुकानांमधून याबाबतचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. या कामासाठी शहरात रेशन दुकानदार व ग्रामीण भागात प्रामुख्याने रेशन दुकानदार तसेच इतर यंत्रणेला प्रतिकार्डमागे पाच रुपये मिळणार आहेत. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १७९ कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. या महिन्यात हा अनुदान स्वरुपातील निधी राज्यभरातील जिल्हा पुरवठा कार्यालयाला मिळण्याची शक्यता आहे. तो मिळाल्यावर संबंधित रेशन दुकानदाराने संकलित केलेल्या माहितीची शहानिशा करून हे पैसे त्याला हे पैसे पुरवठा विभागाकडून दिले जाणार आहेत.

शासनाच्या तरतुदीप्रमाणे रेशन दुकानदारांसाठी दिला जाणारा हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यावर त्याचे संबंधितांना वितरण केले जाईल.
- विवेक आगवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Ration shoppers have to pay Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.