दत्तवाडच्या कृषी तंत्रनिकेतला ‘अ’ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:26+5:302021-06-28T04:17:26+5:30

दत्तवाड (ता. शिरोळ) येथील लठ्ठे एज्युकेशन सांगली संचलित बाबगोंडा देवगोंडा पाटील कृषी तंत्र निकेतन विद्यालय हे महात्मा ज्योतिबा फुले ...

‘A’ rating in Dattawad's Agricultural Technology | दत्तवाडच्या कृषी तंत्रनिकेतला ‘अ’ मानांकन

दत्तवाडच्या कृषी तंत्रनिकेतला ‘अ’ मानांकन

दत्तवाड (ता. शिरोळ) येथील लठ्ठे एज्युकेशन सांगली संचलित बाबगोंडा देवगोंडा पाटील कृषी तंत्र निकेतन विद्यालय हे महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न आहे.

चालू वर्षात २ डिसेंबरला केलेल्या गुणवत्ता व सर्वांगीण विकासाच्या निकषावर विद्यालयास सर्वोच्च अ मानांकन श्रेणी प्राप्त झाली आहे. या विद्यालयामुळे कृषी संशोधन विकास विविध उपक्रम, शैक्षणिक पद्धती, कृषी आधारित उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान, इनोवेशन या विषयाची माहिती विद्यार्थी, पालक व शेती क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिळण्यास मदत होते.

चालू शैक्षणिक वर्षात या केंद्रांतर्गत हरितगृह चालक, माळी प्रशिक्षण केंद्र, उद्यान विद्या व रोपवाटिका व्यवस्थापन, औषधी वनस्पती ओळख व संवर्धन हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, असेही अध्यक्ष कांते यांनी सांगितले. यावेळी सचिव सुहास पाटील, अरुण पाटील, सुकुमार सिदनाळे, प्राचार्य एस. डी. लाड उपस्थित होते.

Web Title: ‘A’ rating in Dattawad's Agricultural Technology