इचलकरंजीत राममंदिर निधी संकलनास रथयात्रेने प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:58+5:302021-01-17T04:21:58+5:30

तालुका अभियान प्रमुख अक्रूर हळदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडा, कैलास गोयल, अभियान शहरप्रमुख रमेश खंडेलवाल, म्हाळसाकांत कवडे, प्रवीण ...

Rathyatra starts fund raising for Ram Mandir in Ichalkaranji | इचलकरंजीत राममंदिर निधी संकलनास रथयात्रेने प्रारंभ

इचलकरंजीत राममंदिर निधी संकलनास रथयात्रेने प्रारंभ

तालुका अभियान प्रमुख अक्रूर हळदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडा, कैलास गोयल, अभियान शहरप्रमुख रमेश खंडेलवाल, म्हाळसाकांत कवडे, प्रवीण सामंत, रमेश लाहोटी, सनतकुमार दायमा यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा मुख्य रस्त्याने झेंडा चौकात जाऊन विसर्जित करण्यात आली. व्हिजन इचलकरंजी संघटनेतर्फे प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रकाश आवाडे यांनी रथयात्रेत येऊन श्रीराम मूर्तीचे दर्शन घेतले. रथयात्रेत धनगरी ढोल, केसरी ढोल ताशा पथक आणि सहभागी रामसेवकांच्या भगव्या टोप्या हे आकर्षण होते. रथयात्रेवर अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले. मिरवणुकीत बाळ महाराज, डॉ. राजेश पवार, विहिंपचे जिल्हामंत्री शिवप्रसाद व्यास, बजरंग दल जिल्हा संयोजक संतोष हत्तीकर, नीलेश आमणे, रामसागर पोटे, प्रकाश पोटे, जितेंद्र मस्कर यांच्यासह रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

(फोटो ओळी) इचलकरंजीत अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन अभियानास श्रीराम रथयात्रेने प्रारंभ झाला. यावेळी रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Rathyatra starts fund raising for Ram Mandir in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.