शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रथातून येत्या गुरुवारी अंबाबाईचा रथोत्सव; आतषबाजी, रांगोळी, विद्युत रोषणाईने होणार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 12:07 IST

बाबासाहेब मुल्ला यांच्या वतीने रथावर पुष्पवृष्टी केली जाणार

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा चैत्रातील रथोत्सव यंदा नव्या सागवानी लाकडातून होणार आहे. त्यासाठी रविवारी रात्री रथाची यशस्वी चाचणी करण्यात आली असून विद्युत रोषणाईमुळे या रथाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. रथोत्सव मार्गावर भव्य आतषबाजी, विद्युत रोषणाई, रांगोळ्या काढून मोठ्या जल्लोषात रथाचे स्वागत करण्यात येणार आहे.करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चांदीच्या रथाच्या आतील लाकडी रथ नाजूक झाला होता. त्याची आतील बांधणी सुटल्याने रथ हलत होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने तत्कालीन सचिव शिवराज नाईकवाडे यांनी नवा रथ बनवून घेतला. हा नवा रथ सुंदर नक्षीकाम व अस्सल सागवान लाकडामुळे चांदीच्या रथापेक्षाही देखणा झाला आहे. विद्युत रोषणाईने त्याचे सौंदर्य अधिक खुलले आहे. रथोत्सवाच्या सोहळ्यापूर्वी रथाची चाचणी करणे गरजेचे असल्याने परिवहन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने देवस्थान समितीला सांगितले. त्यानुसार रविवारी रात्री रथ मंदिराबाहेर काढून चाचणी करण्यात आली. हा रथ बघताच नागरिकांनी छायाचित्र काढण्यासाठी गर्दी केली होती. रथ मार्गावर फेरीवाला संघटनेच्या वतीने रांगोळी काढण्यात येणार आहे. ज्यांना रांगोळी काढायची आहे त्यांनी आपली नावे महाराष्ट्र ग्रंथ भांडार, महाद्वार रोड येथे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता रथोत्सवाला सुरुवात होईल. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार असा रथोत्सवाचा मार्ग असेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेब मुल्ला यांच्या वतीने रथावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे विद्युत रोषणाई, प्रसाद वाटपन्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीने गुजरी कॉर्नर येथे मुंबई, पुणे, कोल्हापुरातील रांगोळी कलाकार रथोत्सव मार्गावर रांगोळी काढतील. तसेच परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. भव्य आतषबाजीने रथाचे स्वागत होईल. भाविकांसाठी अडीच हजार किलो रव्याचा साजूक तुपातील शिरा प्रसाद करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर