रास्ता रोको, रस्त्यावर चटणी भाकर खात दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST2020-12-05T04:51:37+5:302020-12-05T04:51:37+5:30
दिल्ली येथे अन्यायकारक शेतकरीविरोधी कृषी कायदे मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन घेण्यात आले. ...

रास्ता रोको, रस्त्यावर चटणी भाकर खात दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा
दिल्ली येथे अन्यायकारक शेतकरीविरोधी कृषी कायदे मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन घेण्यात आले. हे आंदोलन महामार्गावर होणार होते; परंतु पोलिसांनी दडपशाही करत कार्यकर्त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वडगाव पालिकेसमोर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
गिरीश फोंडे, शिवाजी सूर्यवंशी, प्रशांत आंबी यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी पीएसआय प्रशांत निशाणदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी रवी जाधव, जयश्री नाईक, प्रशांत आंबी, शिवाजीराव सूर्यवंशी, अशोक जाधव, विलासराव पाटील, जगन्नाथ तालुगडे, राजेंद्र महाजन, संपतराव पाटील, सुरेखा शिंदे, जयश्री नाईक, म्हासाबी पकाले, यशोदा झुळे, मंगेश कांबळे, रवींद्र जाधव, सुनील जाधव, ओंकार जाधव, आदर्श निर्मळे, राहुल दळवी, स्नेहल शंकर, सुनील कोळी, श्रीकांत कोळी, सखुबाई पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो - ०२१२२०२०-जेएवाय-०४, ०५
फोटो ओळ - ०४) पेठवडगाव येथील पालिका चौकातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने रास्ता रोको, रस्त्यावर चटणी भाकर खात दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.
०५) अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांना निवेदन देण्यात आले.