शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराजांची राजकोटमधील दुर्मिळ छायाचित्रे झाली उपलब्ध, १९११ च्या ग्रंथामधून आणखी प्रकाशझोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:39 IST

इंद्रजीत सावंत यांची माहिती 

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी अखंड संशोधन सुरू असते. यातूनच महाराज गुजरातमधील राजकोट येथे ज्या ‘राजकुमार कॉलेज’ येथे शिकावयास होते. या कॉलेजवरील ग्रंथांचे १९११ साली प्रकाशित झालेले सात खंड येथील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या संग्रहात दाखल झाले आहेत. सावंत यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या ग्रंथांमध्ये महाराजांचे अनेक दुर्मिळ फोटो असून, त्यांचे डिजिटायझेशन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भावनगरचे भावसिंहजी महाराज हे शाहू महाराजांचे परममित्र आणि राजकोट येथील सहअध्यायी होते. या स्नेहापोटी शाहू महाराज यांनी जुना राजवाडा ते नवीन राजवाडा या राजमार्गाला ‘भावसिंहजी रोड’ असे नाव दिले. भावसिंहजी यांनीही महुआ येथे बांधलेल्या राजवाड्याला ‘शाहू पॅलेस’ असे नाव दिले.या भावसिंहजी महाराजांनी राजकोट येथील राजकुमार कॉलेजवर ‘फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज’ हा सात खंडात्मक ग्रंथ लिहिला. छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक वडील छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचे शिक्षणही येथेच झाले होते. त्यांच्यासह शाहू महाराजांचे अनेक दुर्मिळ असे फोटो या ग्रंथात आहेत.या राजकोट कॉलेजमध्ये सन १८८५ ते १८८९ पर्यंत शाहू महाराजांचे वास्तव्य होते. महाराजांनी याठिकाणी शालेय शिक्षणाबरोबर कवायत, तालीम, घोडेस्वारी, नेमबाजी या मर्दानी खेळांसह क्रिकेट, फुटबॉल यासारख्या मैदानी खेळांचेही प्रशिक्षण घेतले होते. पत्रकार परिषदेला ओंकार कोळेकर, किरणसिंह चव्हाण, हर्षल सुर्वे, अमित आडसुळे, दिगंबर भोसले, शुभम शिरहट्टी आणि सर्जेराव कांबळे उपस्थित होते.