कळंबा तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:33+5:302021-06-18T04:16:33+5:30
कळंबा : गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने कळंबा तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून जूनच्या सुरुवातीला ...

कळंबा तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
कळंबा : गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने कळंबा तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून जूनच्या सुरुवातीला बारा फुटांवर असणारी पाणीपातळी पंधरा फुटांवर पोहोचली आहे. गेले काही दिवस पावसाने उसंत न घेतल्याने कळंबा तलावाचे मुख्य जलस्रोत असणारे कात्यायानी टेकड्यांमधून वाहणारे सातही नैसर्गिक नाले पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. त्यामुळे तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
दिवसेंदिवस पावसाळ्यात तलावावर पर्यटकांची गर्दी वाढत असून तलावाच्या बंधारा पिचिंगचे काम तीन वेळा निकृष्ट झाल्याने बंधारा धोकादायक बनला आहे. बंधाऱ्यावरील पदपथ विकसित करण्यात आला नसल्याने निसरडा बनला आहे. मनोऱ्याचे लोखंडी संरक्षक कठडे तुटल्यामुळे मनोरा धोकादायक बनला आहे.
तलावाची पाणीपातळी सत्तावीस फुटांवर पोहोचली की तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहतो. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या तीन दिवसांत तलाव भरून सांडव्यावरून ओसंडून वाहत होता. गतवर्षीच्या दमदार पावसाने तलाव चारवेळा सांडव्यावरून ओसंडून वाहिला होता.