शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांमध्ये पदवीचे वर्ग सुरू करण्याची वेगाने तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:57 IST

College Kolhapur- राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या सूचनेनुसार पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सोमवार (दि. १२)पासून वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालयांकडून शुक्रवारपासून सुरू झाली. वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालयांमध्ये पदवीचे वर्ग सुरू करण्याची वेगाने तयारी निर्जंतुकीकरण, स्वच्छता सुरू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

 कोल्हापूर : राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या सूचनेनुसार पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सोमवार (दि. १२)पासून वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालयांकडून शुक्रवारपासून सुरू झाली. वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे.वर्ग सुरू करण्याची सूचना विद्यापीठ प्रशासनाने ईमेलद्वारे महाविद्यालयांना गुरुवारी केल्या आहेत. त्यानुसार तयारी करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यापीठ संलग्नित बहुतांश महाविद्यालयांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

त्यानंतर वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता, हात धुण्यासह सॅनिटायझर स्टँड, थर्मल गनने तपासणी करण्याची व्यवस्था करण्याचे काम महाविद्यालयांमध्ये सुरू झाले. रविवारी सुटी असल्याने शनिवारी सर्व तयारी पूर्ण करण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे. महाविद्यालयांप्रमाणे विद्यापीठातील कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या अधिविभागांमध्ये वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे.महाविद्यालयांना सूचनाविद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांना विचार करून आमच्या समितीने वर्ग सुरू करण्याच्या शिफारस विद्यापीठ प्रशासनाला केली. त्यानुसार विद्यापीठाने अधिकार मंडळांची मान्यता घेऊन महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या विद्यापीठाच्या समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी दिली.

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याची तयारी आमच्या महाविद्यालयात सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेऊन वर्ग सुरू केले जातील.- डॉ. राजेंद्र लोखंडे,प्राचार्य, महावीर महाविद्यालय

आकडेवारी दृष्टिक्षेप

  • विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये : २९३
  • एकूण विद्यार्थी : २५६२४२
  • मुले : १२७४२८
  • मुली : १२१६६७

७५ टक्के उपस्थितीची अट शिथील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची रोज वर्गातील उपस्थिती ५० टक्के ठेवायची आहे. त्याचा विचार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यार्थ्यांची वर्गातील ७५ टक्के उपस्थितीची अट शिथील केली आहे. त्याबाबतची सूचना विद्यापीठाने अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयांना ई-मेलद्वारे केली आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर