‘उच्च शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ उपक्रमाची वेगाने तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:53+5:302021-01-23T04:25:53+5:30
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ हा उपक्रम जाहीर ...

‘उच्च शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ उपक्रमाची वेगाने तयारी
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ हा उपक्रम जाहीर केला आहे. त्याची सुरुवात सोमवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठामध्ये ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ने होणार आहे. त्याची विद्यापीठात वेगाने तयारी सुरू आहे.
विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यापीठ प्रशासनाने विविध समित्या स्थापन करून काम सुरू केले आहे. विद्यापीठाने निवेदने स्वीकारण्यासाठी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ याच नावाने स्वतंत्र पोर्टल निर्माण केले आहे. या उपक्रमास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक, आदी उपस्थित असणार आहेत. या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्थांनी आपला सहभाग नोंदवून आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले.