कसबा तारळेत व्यापाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:25+5:302021-04-27T04:24:25+5:30
अत्यावश्यक सेवेत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आज,सोमवार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शंभर ...

कसबा तारळेत व्यापाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट
अत्यावश्यक सेवेत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आज,सोमवार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत शंभर व्यावसायिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले यामध्ये एका व्यावसायिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.उर्वरित नव्व्याण्णव अहवाल निगेटिव्ह आले. बाधित रुग्णाला पुढील उपचारासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना सकाळी सात ते अकरा या वेळेतच व्यवसाय करण्यास मुभा दिली आहे; मात्र अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना कोरोनाची टेस्ट व लसीकरण करणे अनिवार्य आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेत व्यवसाय करणारे मात्र कोरोनाची टेस्ट व लसीकरण न केलेल्यांसाठी आज सोमवार आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत शंभर व्यावसायिकांचे स्वॅब तपासण्यात आले यामध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.