मुरगूडमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप, रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:47+5:302021-04-30T04:30:47+5:30
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तसेच आजूबाजूच्या गावांतूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. संशयित रुग्णांना कागल ...

मुरगूडमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप, रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तसेच आजूबाजूच्या गावांतूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. संशयित रुग्णांना कागल किंवा कोल्हापूर याच ठिकाणी तपासणीसाठी पाठवावे लागत होते. त्यामुळे अहवाल येण्यास बराच वेळ लागत होता. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त होती. रुग्णांची सोय व्हावी व अहवाल तत्काळ मिळावेत यासाठी पालिका आणि ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर दोन दिवसांत रुग्णालयात संशयित रुग्णांचे स्राव घेण्यासाठी आरटीपीसीआर केंद्र सुरू होणार असल्याचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.
रॅपिड अँटिजेन टेस्ट केंद्रात मोठ्या प्रमाणात नागरिक तपासणी करण्यासाठी येत आहेत.