विवाहित महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST2021-01-16T04:28:02+5:302021-01-16T04:28:02+5:30

कोडोली : माले (ता. पन्हाळा) येथील विवाहित महिला अंघोळ करीत असताना मोबाईलमध्ये चोरून काढलेले फोटो डिलिट करण्यासाठी तिला ब्लॅकमेल ...

Rape of a married woman, filing a crime | विवाहित महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

विवाहित महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

कोडोली :

माले (ता. पन्हाळा) येथील विवाहित महिला अंघोळ करीत असताना मोबाईलमध्ये चोरून काढलेले फोटो डिलिट करण्यासाठी तिला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने संबंध ठेवल्याप्रकरणी तसेच तिच्याकडून ५० हजारांची मागणी केल्याप्रकरणी वडापचालक संतोष बाळासो सोळसे (रा. माले, ता. पन्हाळा) याच्याविरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, सुमारे दोन वर्षांपूर्वी पीडित महिला अंघोळ करीत असताना चोरून मोबाईलमध्ये आपण फोटो काढले आहे व रेकॉर्डिंग केले आहे. ते डिलिट करावयाचे असल्यास दुपारी घरी ये, असे त्याने सांगितले. पीडित महिला घरी न गेल्याने दोन दिवसांनी पुन्हा दुकानात ती एकटीच असल्याचा फायदा घेत त्याने दुकानात येऊन घरी ये न आल्यास फोटो सर्वत्र पाठविणार, अशी धमकी दिली. यावेळी पीडित महिलेने फोटो व रेकॉर्डिंग दाखव असे विचारल्यावर त्याने शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. तिने नकार देत घरातून बाहेर जात असताना बलात्कार केला. त्यानंतर वारंवार सोळसे याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. नकार दिल्यास मुलांना व नवऱ्याला ठार मारण्याची धमकी देत होता. दि. ८ जानेवारी २१ रोजी पीडित महिलेकडे सोळसे याने रु. ५० हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास फोटो सर्वत्र प्रसारित करीन, अशी धमकीही दिली. सोळसे याच्याकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून ही बाब पतीस सांगितली व पोलिसांत फिर्याद देत असल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Rape of a married woman, filing a crime