रावसाहेब भोसले यांचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:43+5:302021-03-26T04:23:43+5:30
शिरोळ : कामगारांचे हित व सकारात्मक दृष्टी ठेवून रावसाहेब भोसले यांनी कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्यात चांगला समन्वय ठेवला. ...

रावसाहेब भोसले यांचे कार्य कौतुकास्पद
शिरोळ : कामगारांचे हित व सकारात्मक दृष्टी ठेवून रावसाहेब भोसले यांनी कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्यात चांगला समन्वय ठेवला. त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी मार्गदर्शक म्हणून कारखाना कामगारांना प्रेरणा द्यावी, असे प्रतिपादन दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
येथील दत्त साखर कारखान्याचा गळीत हंगाम सांगता कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते भोसले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील. संजॉय संकपाळ, विश्वजित शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भोसले म्हणाले, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारे निर्णय कारखाने घेतले आहेत. उत्कृष्ट व्यवस्थापन, कामगारांविषयी चांगले निर्णय घेणारा कारखाना असा लौकिक सर्वदूर पोहोचला आहे. कारखान्याच्या हिताबरोबरच औद्योगिक शांतता निर्माण करण्यासाठी कामगारांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सचिव अशोक शिंदे, श्रीशैल्य हेगाण्णा, दिलीप जाधव, राजेंद्र केरीपाळे, जयसिंग जाधव, महेंद्र बागी, अशोकराव कोळेकर, दगडू माने, बाळासाहेब बनगे उपस्थित होते.
फोटो - २५०३२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथे रावसाहेब भोसले यांचा सपत्नीक सत्कार अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी एम. व्ही. पाटील, महेंद्र बागी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.