शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

रंकाळाप्रेमींनी तांबट कमान, रंकाळा परिसर केला स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 2:42 PM

महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी मंगळवारी संयुक्तपणे जुन्या वाशी नाक्याजवळील तांबट कमान, रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

ठळक मुद्देरंकाळाप्रेमींनी तांबट कमान, रंकाळा परिसर केला स्वच्छरंकाळ्यावर दारू पित असतील त्यांना बसू देणार नाही, मंडळ कार्यकर्त्याची प्रतिज्ञा

कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी मंगळवारी संयुक्तपणे जुन्या वाशी नाक्याजवळील तांबट कमान, रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.तांबट कमानीजवळ विसर्जन कुंड बांधण्यात आला असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. याशिवाय कुंडाच्या भोवती गवत वाढलेले होते. खंडोबा देवालय तरुण मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी स्वत:हून रंकाळ्याच्या कचरा उठाव या मोहिमेत सकाळी सात वाजल्यापासून सामील झाले. छोटी छोटी मुले सुद्धा या मोहिमेत सहभागी झाली होती. पाण्यातील प्लास्टिक, कचरा, गाळसुद्धा या मुलांनी काढला.रात्रीच्यावेळी दारू प्यायला तिथे लोक येतात आणि बाटल्या फोडून जातात, उतारे टाकत अन्नाची नासाडी करतात, याबद्दल या परिसरात नाराजी होती. येथून पुढे मंडळाचे कार्यकर्ते प्रबोधन करणार आहेत. रंकाळ्यावर दारू पिणार नाही आणि कोण असे दारू पित असतील तर त्यांना तिथे बसू देणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.काही महिला, शिक्षिका, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. या मोहिमेकरिता महापालिकेने जेसीबी डंपर आणि सफाई कर्मचारी दिले. आरोग्य निरीक्षक गीता हसूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. कोल्हापूर महानगरपालिका आणि शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तांबट कमान येथे स्वच्छता मोहीम राबविली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर