कापशी कोविड केंद्रात रंगली ‘संगीत संध्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:35+5:302021-07-12T04:15:35+5:30
त्याचाच एक भाग म्हणून कोविड केंद्रात ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये निखिल मधाळे, ...

कापशी कोविड केंद्रात रंगली ‘संगीत संध्या’
त्याचाच एक भाग म्हणून कोविड केंद्रात ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये निखिल मधाळे, कोल्हापूर; तबला संगीत विशारद प्रवीण केंगार, अभय पोतदार, हातकणंगले; नवनाथ कांबळे या सर्व कलाकारांनी आपली कला सादर केली. अभय पोतदार यांनी गायलेल्या ‘दत्ता धाव रे’ या अभंगाने कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. नवनाथ कांबळे यांनी गायलेल्या ‘विसरू नको रे आई बापाला’ या अभंगाने लोकांच्या हृदयाला हात घातला, तर निखिल मधाळे यांनी अनेक उत्कृष्ट भावगीतांचे गायन केले.
यावेळी बोलताना शशिकांत खोत म्हणाले, रुग्णांचे मनोधैर्य वाढवावे आणि त्यांना एका वेगळ्या वातावरणाचा अनुभव मिळावा, यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवीत असून आजपर्यंत भजन, गाणी, हास्याचे कार्यक्रम, योगा, प्रबोधनात्मक व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.