रामप्रताप झंवर अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:03+5:302021-06-16T04:33:03+5:30
फौंड्री उद्योगातील भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले ...

रामप्रताप झंवर अनंतात विलीन
फौंड्री उद्योगातील भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
झंवर यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी नऊ वाजता शिवाजी पार्क येथील निवासस्थान येथून फुलांनी सजवलेल्या मोठ्या चारचाकी गाडीतून निघाली. त्यांचे पार्थिव सकाळी दहाच्या सुमारास शिरोली एमआयडीसीमधील श्रीराम फौंड्री येथे दर्शनासाठी आणले होते. याठिकाणी कंपनीतील कामगारांनी झंवर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच शिरोली, गोकूळ शिरगाव, कागल, कोल्हापूर, इचलकरंजी, आष्टा येथील उद्योजक, मित्रपरिवार, स्नेही यांनी अंत्यदर्शन घेतले. शिरोली एमआयडीसीमधून कसबा बावडा मार्गे अंत्ययात्रा निघाली. साडेअकराच्या सुमारास कसबा बावडा येथील स्मशानभूमीत मुलगा नरेंद्र झंवर यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्णी दिला. या वेळी नातू नीरज झंवर, रोहन झंवर, नितीन झंवर, स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील, उद्योजक राजू पाटील, सचिन पाटील, शिरीष सप्रे, शरद तोतला, जयदीप चौगले, कागल असोसिएशनचे गोरख माळी, भीमराव खाडे, अनुप पाटील, अमोल पाटील, दीपक चरणे, रवी पाटील, समीर पाटील यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.