शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेतील अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती वादात, सेवाज्येष्ठताही डावलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:53 IST

हर्षजित घाटगे पुन्हा जलअभियंता

कोल्हापूर : महानगरपालिकेतील शहर अभियंतापद बुधवारी पुन्हा एकदा वादात सापडले. अवघ्या दीड महिन्यापूर्वी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ज्या हर्षजित घाटगे यांच्याकडे शहर अभियंता पदाचा कार्यभार दिला, त्यांनीच तो काढून घेत सेवाज्येष्ठतेने कनिष्ठ असलेल्या रमेश मस्कर यांच्याकडे सोपविला. नगरविकास विभागातील उपसचिव यांच्या आदेशानेच हा कार्यभार मस्कर यांच्याकडे दिला आहे. मस्कर यांच्याकडे हा कार्यभार दिला जावा यासाठी सरकारमधील काही लोक सक्रिय होते.नेत्रदीप सरनोबत दि. ३१ मे २०२५ निवृत्त झाल्यानंतर एक जूनपासून प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सेवाज्येष्ठतेने वरिष्ठ असल्यामुळे जलअभियंता असलेल्या हर्षजित घाटगे यांच्याकडे हा कार्यभार सोपविला. घाटगे हे मुळ कार्यकारी अभियंता आहेत. घाटगे यांच्याकडे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्यानंतर उपशहर अभियंता असलेल्या रमेश मस्कर यांच्याकडे जल अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.परंतु, मस्कर या पदावर काम करण्यास नाखूश होते. तेव्हापासून मंत्रालय पातळीवर त्यांनी शहर अभियंता पदावर नियुक्तीसाठी प्रयत्न चालविल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. बुधवारी सायंकाळी प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी घाटगे व मस्कर यांचे कार्यभार बदलल्याचा आदेश काढल्याने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.घाटगे यांच्याकडील कार्यभार काढून तो मस्कर यांच्याकडे देताना कोणतेही स्पष्ट कारण प्रशासकांनी दिलेले नाही. अमृत योजनेची कामे ९० टक्के पूर्ण झाली असून, ही कामे पूर्ण होईपर्यंत घाटगे यांच्याकडे जल अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत असल्याचे प्रशासकांच्या आदेशात म्हटले आहे.

दोन वेळा न मागता नियुक्ती, दूरही केलेहर्षजित घाटगे महापालिकेत सर्वांत ज्येष्ठ अभियंता असून, त्यांची नियुक्ती कार्यभारी अभियंता अशी आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी नेत्रदीप सरनोबत यांना बाजूला केल्यानंतर घाटगे यांच्याकडे कार्यभार दिला. वर्षभर काम पाहिल्यानंतर सरनोबत यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे सरनोबत निवृत्त झाल्यानंतर पुन्हा घाटगे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला. दोन वेळा न मागता शहर अभियंता पदाचा कार्यभार दिला आणि नंतर तो अपमानास्पदरीत्या काढून घेतल्यामुळे घाटगे नाराज झाले असल्याची चर्चा आहे.

सरकारचा हस्तक्षेप..महापालिका अधिकाऱ्यांच्या खात्याअंतर्गत बदल्या करण्याचा, खाते वाटप करण्याचा अधिकार हा प्रशासक यांचा आहे. ९२ वी ९३ वी घटना दुरुस्ती करताना राज्य सरकारचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून महापालिकांना स्वायत्तता देण्यात आली. परंतुु, नेत्रदीप सरनोबत व हर्षजित घाटगे यांना या पदावरून दूर करताना नगरविकास विभागाने आदेश दिल्यामुळे प्रशासकांच्या अधिकाराचे अवमूल्यन झाले असल्याचे सांगण्यात येते.

मस्कर यांची नियुक्ती ही कुण्या पुढाऱ्याची सुपारीनगररचना विभागात कार्यरत असताना रमेश मस्कर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून, त्यांच्या दोन चौकशी सुरू आहेत. अशा माणसाला शहर अभियंता या संवैधानिक पदावर बसविण्यात उठाठेव करणाऱ्या कोणीतरी पुढाऱ्याने सुपारी घेतली आहे, त्याचाही पर्दाफाश करू, असा इशारा माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.कोणाला नेमायचे सरकारला अधिकार - मस्करदरम्यान, रमेश मस्कर यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्यावर कसलेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. कसली चौकशीही सुरू नाही. सरकारने माझ्याकडे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. कायमची नियुक्ती केलेली नाही. त्यात चुकीचे काहीही नाही. ‘एमसीएसआर’च्या कलम ४५ नुसार तो अधिकार सरकारला आहे. महादेव फुलारी, सुरेश पाटील, एन. एस. पोवार हे कनिष्ठ अभियंता असूनही त्यांच्याकडे उपशहर अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तशाच पद्धतीने सरकारकडून माझ्याकडेही शहर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

मस्कर यांच्याकडे कार्यभार दिल्याचे पडसाद महापालिका वर्तुळात उमटले असून, अधिकारी वर्गातही नाराजी आहे. आम्ही काही माजी नगरसेवक प्रशासकांना भेटून मस्कर यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी करणार आहोत. तिथे दखल घेतली नाही तर उच्च न्यायालयात जाऊ  - प्रा. जयंत पाटील माजी नगरसेवक, कोल्हापूर.