वाढदिवसानिमित्त रमेश कांबळे यांचा वेगळा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:18+5:302020-12-09T04:19:18+5:30
शहापूर : येथील माजी शिक्षण समिती सदस्य रमेश कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल व त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, ...

वाढदिवसानिमित्त रमेश कांबळे यांचा वेगळा संकल्प
शहापूर : येथील माजी शिक्षण समिती सदस्य रमेश कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल व त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कांबळे यांनी मेडिकल विद्यार्थ्यांना स्टडी करण्यासाठी मरणोत्तर देहदान करणे, असा संकल्प केला आहे.
रमेश कांबळे यांनी ५० वर्षे राजकीय व सामाजिक काम केले आहे. हे काम करत असताना तुझा-माझा देह कुणाच्या तरी उपयोगी व्हावा, यासाठी मेडिकल विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी कांबळे हे मरणोत्तर देहदान करणार असल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला. पक्षप्रवेश व ७ डिसेंबरला वाढदिवसादिवशी माजी आमदार सुजित मिणचेकर, अशोक जांभळे, राजीव आवळे, नितीन जांभळे, मराठा मंडळाचे उपाध्यक्ष सचिन हळदकर, तसेच शहरातील नगरसेवक, व्यावसायिक व दलित समाजातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
(फोटो ओळी)
०८१२२०२०-आयसीएच-०६
रमेश कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी आमदार अशोक जांभळे, नगरसेवक नितीन जांभळे, रवी कांबळे, सुभाष डावरे, आदी.