शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हरिपाठाचे पठण-गायन, वऱ्हाडींना तीन हजार पुस्तिकेचे वाटप; सरवडेत पार पडला आगळावेगळा लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:00 IST

पै-पाहुणे, आप्तेष्ट रंगले सामूहिक हरिपाठ गायनात

दत्ता लोकरेसरवडे : लग्न म्हटले की साउंड सिस्टिम आणि त्यांचा कर्णकर्कश आवाज, साथीला तरुणाईबरोबर महिला वऱ्हाडी मंडळीचा डान्स ठरलेला. रात्री वरातीचा ताल तर तरंगीलच, पण सरवडे (ता. राधानगरी) येथील राम मोरे यांनी आपल्या विवाहप्रसंगी या सर्वांना फाटा देत हरिपाठाचे सामुदायिक पठण-गायन आणि वऱ्हाडी मंडळींना अक्षतांसोबत तीन हजार हरिपाठ पुस्तिकेचे वाटप केले. या आदर्श उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे.सरवडे येथील ह.भ.प. वसंत भाऊ मोरे हे पती-पत्नी विठ्ठलाचे परमभक्त. त्यांचे घर तर साक्षात मंदिरच. घरी प्रत्येकजण एकमेकांना माउली म्हणूनच बोलवीत असतो. सर्वांच्या आचार-विचारात वारकरी धर्माचे काटेकोर पालन हीच या कुटुंबाची ठळक ओळख. वसंत मोरे यांचा मुलगा राम याचा कासारपुतळे येथील राजेंद्र शिवाजी पाटील यांची कन्या स्वाती हिच्याशी नुकताच झाला.वर-वधूकडील दोन्ही कुटुंबे वारकरी संप्रदाय अंगीकारलेली आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांचा विवाह सोहळा वारकरी संप्रदायाला पाईक राहत करण्याचा निर्णय घेतला आणि भागातील वारकरी संप्रदायाबरोबरच पै- पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.संत ज्ञानोबा तुकाराम आध्यात्मिक केंद्र तुरंबे येथील शेकडो तरुण वारकरी व बाल वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात हरिपाठ, हरिजागर करत लग्नमंडपात रंगत आणली. अक्षता वाटत असतानाच उपस्थितांना हरिपाठाचे वाटप करण्यात आले. तसेच लग्नमंडपात साउंड सिस्टीमला व गायन करणारा वाद्यवृंदसुध्दा विठ्ठल नामाचा गजर करत होते.त्यामुळे अलीकडे डॉल्बीच्या ठेक्यावर धांगडधिंगा घालणारी तरुणाई नवरा-नवरीला हार-तुरे घालताना उचलून होणारा किळसवाणा प्रकार याला या विवाहसोहळ्यात फाटा दिला गेला होता. तर जुन्या चालीरीतीप्रमाणे अक्षतादेखील गोरज मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी वधू-वरांच्या डोक्यावर टाकण्यात आल्या. या सर्वांचे उपस्थित सर्वच मंडळींकडून कौतुक होत होते.