दलित-मुस्लिम संघटनेची रॅली

By Admin | Updated: September 20, 2014 00:10 IST2014-09-20T00:10:35+5:302014-09-20T00:10:35+5:30

बचाव बचाव-संविधान बचाव : मोटारसायकल रॅलीस प्रतिसाद

Rally of Dalit-Muslim Association | दलित-मुस्लिम संघटनेची रॅली

दलित-मुस्लिम संघटनेची रॅली

शिरोळ : दलित-मुस्लिम ऐक्याचा विजय असो, बचाव बचाव - संविधान बचाव, अशा घोषणा देत दलित-मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी कुरुंदवाड ते जयसिंगपूर अशी मोटारसायकल रॅली काढली. कुरुंदवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ झाला. तीनशेहून अधिक मोटारसायकलवरून सुमारे सातशेहून अधिक दलित-मुस्लिम कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
रॅलीचे नेतृत्व दलित-मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेख, दलितमित्र अशोकराव माने, संघर्ष समितीचे रमेश शिंदे, विजय खातेदार, सुनील इनामदार, मुस्लिम ओबीसी संघटनेचे एम. एस. गवंडी, सुनील शेळके, अस्लम मुल्ला, फिरोज अत्तार, संतोष कांबळे, आदींनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या सामाजिक न्यायाचे हक्क, दलित-मुस्लिम यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, सामाजिक समता, बंधुत्व यांचे प्रबोधन व प्रसार करण्यासाठी ही मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर रॅलीची सांगता झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Rally of Dalit-Muslim Association