एक राखी जवानांसाठी
By Admin | Updated: August 6, 2014 00:02 IST2014-08-05T23:44:36+5:302014-08-06T00:02:15+5:30
विवेकानंद ट्रस्टचे आयोजन

एक राखी जवानांसाठी
कोल्हापूर : देशरक्षणाचे व्रत हाती घेतलेल्या सीमेवरील जवानांना श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राख्या पाठवण्यात येणार आहेत. यासाठी राख्यांचे संकलन करण्यात येत असून, अधिकाधिक महिलांनी आपल्या राख्या ७ तारखेपर्यंत संस्थेकडे जमा कराव्यात, असे आवाहन केले आहे. देशरक्षाबंधन हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.८) राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. जवानांना राख्या पाठवण्यासाठी महिलांनी त्या प्रबोधन क्लासेस , अंबा कॅसेट हाऊस महाद्वार रोड, नागराज पेपर स्टॉल शुक्रवार गेट, श्री शृंगार, भिवटे पोहे सेंटर,मथुरा कोल्ड्रींक महाद्वार रोड, कामत झेरॉक्स शहाजी कॉलेजजवळ, देवयानी नेट कॅफे-ईगल फ्राईड, विशेष पियु शॉपी-विवेकानंद कॉलेज, अंबिका मेडिकल्स-माणिक चेंबर्स, भगिनी मंच शिवसेना शहर कार्यालय, मैत्रिण मंच-पंचरत्न प्लाझा गुजरी. राधानगरी-तुषार साळगांवकर, विजय बकरे पेपर स्टॉल, नागाव-राजेंद्र पाटील, गारगोटी-आझाद पान शॉप, इचलकरंजी-वृषाली ट्रॅव्हल्स-रत्नाकर बँकेसमोर, कागल-राधेशाम लेडीज शॉप, गोकुळ शिरगाव-जितेंद्र कटलरी येथे पाठवावेत.