शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमाता दर्जा सर्व देशी गायींना, अनुदान मिळणार गोशाळांनाच; पशुपालक राहणार वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:48 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : राज्य शासनाने देशी गायींना ‘राज्यमाता’चा दर्जा देऊन त्यांच्या संगोपनासाठी पशुपालकांना दिवसाला पन्नास रुपये अनुदान देण्याचा ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाने देशी गायींना ‘राज्यमाता’चा दर्जा देऊन त्यांच्या संगोपनासाठी पशुपालकांना दिवसाला पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, वयोवृद्ध देशी गायींचे संगोपन करणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. दूध उत्पादन बंद आणि दिवसाला दोनशे रुपये संगोपनाचा खर्च येतो. त्यामुळे शेवटपर्यंत त्या गायींचे संगोपन करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते.

हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय (गाईचे शेण), गोमूत्र (गाईचे मूत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. दूध व्यवसायासाठी देशी गायीचे संगोपन करणे परवडत नाही.

त्यामुळेच अलिकडे संकरीत गायींचे प्रमाण वाढत असून त्या तुलनेत देशी गायी कमी होत आहेत. देशी गायी टिकल्या पाहिजेत, यासाठी राज्य शासनाने संगोपन करणाऱ्या पशुपालकाला प्रतिदिन पन्नास रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात २ लाख ८३ हजार गायवर्गीय प्राणी आहेत. त्यापैकी १ लाख ४ हजार देशी गायींचा समावेश आहे.

देशी गायीचे दूध १०० रुपये लिटरदेशी गायीचा उपयोग खूप आहे. तिचे दूध, दही, तूप अतिशय पौष्टिक व आरोग्याला चांगले असते. त्यामुळे दुधाला मागणी अधिक असते. साधारणत: १०० रुपये लिटर दर असून तुपाचा दर हजार रुपयांपर्यंत आहे.

खिलार खोंडासाठीच गायीपूर्वी शेतीच्या कामासाठी बैलांची गरज होती, त्यामुळे आपल्या गोठ्यातच चांगले खाेंड तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता. काळाच्या ओघात यांत्रिकीकरणामुळे गोठ्यातील बैल कमी झाले. आता, केवळ हौशी शेतकरीच खोंडासाठी देशी गायीचे संगोपन करत आहेत.

देशी गाय दूध कमी देते, त्यात तिचा भाकडकाळही जास्त असतो. गायीचे वय झाल्यानंतर तिचे संगोपन करणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असते. सकस वैरण, पशुखाद्य व औषधोपचाराचा खर्च दिवसाला दोनशेपेक्षा अधिक येतो. त्यामुळे शासनाने अनुदानात वाढ करण्याची गरज आहे. - अजित खाडे (पशुपालक, सांगरूळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcowगायGovernmentसरकार