कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टीका केली होती. तर, मुकेश अंबानींवरही त्यांनी टीकास्त्र सोडले होते. दरम्यानच शेट्टींनी सात वर्षांपूर्वी महादेवी हत्तीणीबाबत वनविभागाला लिहिलेले पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. माधुरी हत्ती वनविभागाने घेऊन जावे, या आशयाचे ते पत्र आहे. यावर आता शेट्टींनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करुन प्रतिक्रिया देत वस्तुस्थितीचा खुलासा केला आहे.
वाचा- अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागरराजू शेट्टींनी सांगितली वस्तुस्थिती ? २०१८ साली नांदणी मठातील हत्तीची देखभाल करणारा नागाप्पा हा माहुत हदयविकाराने आजारी पडला. डॅाक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. दरम्यान माधुरीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षीत माहुत नसल्याने नांदणी मठाचे विश्वस्त माझ्याकडे येवून माहुत मिळेपर्यंत काही दिवसासाठी सदरचा हत्ती वनविभागाच्या गडचिरोली हत्तीकेंद्रात सोडण्याबाबत विनंती केली.
वाचा: नांदणी येथे दगडफेकीत १२ पोलिस जखमी, सात वाहने फोडली; १२५ जणांवर गुन्हे दाखलत्यानुसार मी २०१८ साली वनविभागास पत्रव्यवहार केला. मात्र वनविभागाने या गोष्टीस असमर्थता दर्शविले. त्यानंतर थोड्या दिवसांनी इस्माईल या माहुतास अथक प्रयत्नातून नांदणी मठाच्या विश्वस्तांनी शोधून आणले. त्यादिवसापासून ते आजअखेर माधुरीची चांगल्या पध्दतीने देखभाल व काळजी घेतली गेली आहे. काही मंडळी खोडसाळपणाने राजकीय आकसापोटी माझे २०१८ साली वनविभागास देण्यात आलेले पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याचे शेट्टी म्हणाले.