शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला पाठीत लाथ घालून जागे करु, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 11:51 IST

आम्ही काय सरकारकडे चंद्र, सूर्य मागतोय काय? दिवसा दहा तास वीज तर मागत आहे

कोल्हापूर : गेली अकरा दिवस शेतकरी महावितरण समोर बसला असताना प्रश्न मार्गी लागत नसेल तर आता राज्य सरकारचे दिवस भरले आहेत. राज्य सरकार जिवंत नसल्याने त्याची संवेदना संपली आहे. त्यामुळे शनिवारी सरकारचे बारावे घालणार असून, झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारच्या पाठीत लाथ घालून जागे केल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिला.शेट्टी म्हणाले की, पंढरपूर तालुक्यात एका युवा शेतकऱ्याने वीज बिल भरता येत नाही म्हणून आत्महत्या केली. शेतकऱ्यांनी संयमाने रहावे. सरकारला सळो की पळो करून सोडू. आजपासून आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून, राज्यभर याचे पडसाद उमटतील. राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे कसे करायचे, हे संघटनेला चांगलेच माहिती आहे. अजूनही जागे व्हा, अन्यथा तुमचे कपडे उतरवायला फार वेळ लागणार नाही.

१२ कार्यकर्ते मुंडन करणार

राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विधिवत पूजा करून सरकारचं बारावं महावितरणच्या कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता घातले जाणार आहे. बारा कार्यकर्ते मुंडन करून सरकारचा निषेध करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

आम्ही काय चंद्र, सूर्य मागतोय का?शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तिथे धरणे उभारली, त्यावर वीज निर्मिती करता. आम्ही काय सरकारकडे चंद्र, सूर्य मागतोय काय? दिवसा दहा तास वीज मागत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी