शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

Maharashtra Vidhan Sabha 2019:सांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:27 IST

सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे.

ठळक मुद्देसांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रहगणपतराव देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट

कोल्हापूर : सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे. आजच्या परिस्थितीत शेट्टी हेच गणपतरावांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवू शकतात, असा मतप्रवाह ‘शेकाप’च्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांनी शेट्टी यांची भेट घेऊन सांगोल्यातून लढावे, असा आग्रह धरला आहे.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून १९६२ पासून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून गेली ५५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. याला अपवाद फक्त १९७२ आणि १९९५ ची निवडणूक राहिली. १९७२ मध्ये ते पहिल्यांदा पराभूत झाले; पण लगेच पोटनिवडणूक लागल्याने ते पुन्हा विजयी झाले.

१९९५ मध्ये युतीच्या लाटेत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता गणपतराव देशमुख यांनी ५५ वर्षे आमदार म्हणून राहण्याचा जागतिक विक्रमच आपल्या नावावर केला. ‘गिनीज बुक’मधील विक्रमापेक्षा जनतेच्या मनावर तब्बल साडेपाच दशके अधिराज्य गाजविण्याचा विक्रम करणारे गणपतराव आता ९४ वर्षांचे आहेत.कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी प्रकृती साथ देत नसल्याने नव्या दमाच्या व्यक्तीकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी, असे सांगून त्यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. विनंत्या करूनही त्यांनी निर्णय न बदलल्याने अखेर नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.गणपतरावांचा वारसदार हादेखील त्यांच्याप्रमाणेच विचारांशी, चळवळीशी आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधीलकी मानणाराच असावा, असे निकष ठरविण्यात आले. विशेष म्हणजे मतदारसंघाला डाग लागू द्यायचा नाही, ही एकमेव धारणा घेऊन शोध सुरू झाला. त्यांच्या या प्राथमिक निकषांत शेतकरी चळवळीतून पुढे आलेले राजू शेट्टी बसत असल्याने कार्यकर्त्यांनी शिरोळला येऊन त्यांच्याकडे तसा आग्रह धरला आहे.

शेतकऱ्यांची चळवळ कमकुवत होणे ही आजच्या घडीला धोक्याची घंटा असल्याने ती सुरू राहायची असल्यास शेट्टींना बळ मिळणे गरजेचे आहे. शेतकरी आणि दुष्काळी समाजाचा आवाज विधानसभेत गणपतरावांप्रमाणेच ताकदीने पोहोचविण्याची धमक आजच्या घडीला शेट्टी यांच्याव्यतिरिक्त कुणाकडे नाही, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. यातूनच त्यांनी आग्रह धरला आहे; पण शेट्टी यांनी अजून होकार दर्शविलेला नाही. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुख