शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

Maharashtra Vidhan Sabha 2019: 'स्वाभिमानी'ला हवा सन्मान, राष्ट्रवादीकडे मागितलं 'घरचं मैदान'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:36 PM

शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर राष्ट्रवादीने जोर लावला आहे, तर ‘स्वाभिमानी’ने घरचे मैदान म्हणून आग्रह धरला आहे.

ठळक मुद्दे'स्वाभिमानी'ला हवा सन्मान, राष्ट्रवादीकडे मागितलं 'घरचं मैदान'!सन्मान न दिल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर राष्ट्रवादीने जोर लावला आहे, तर ‘स्वाभिमानी’ने घरचे मैदान म्हणून आग्रह धरला आहे.

जागा सुटत नसल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा देऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नही ‘स्वाभिमानी’कडून सुरू आहे. येथून सावकर मादनाईक अथवा स्वत: राजू शेट्टीच रिंगणात असणार आहेत. ही जागा संघटनेकडे गेल्यास अडचण होणार, हे गृहीत धरून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बंडखोरीस प्रवृत्त करण्याच्याही हालचाली सुरू आहेत.शिरोळ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला; पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील यांनी बंडखोरी केली. शिवसेनेची उमेदवारी घेत त्यांनी विजयही मिळविला. यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.

‘स्वाभिमानी’चे उमेदवार सावकर मादनाईक हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. स्वाभिमानी आणि भाजपची युती होती. आता स्वाभिमानी-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यांनी चार जागा मागितल्या असल्या तरी शिरोळवर प्राधान्याने हक्क सांगितला आहे.

शिरोळ मिळाले नाही तर आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचाही निर्धार करण्यात आला आहे. आघाडी धर्म म्हणून ‘स्वाभिमानी’ला जागा दिली तरी यड्रावकरांना बंडखोरी करायला लावण्याच्या हालचाली वाढल्याने सावध झालेल्या ‘स्वाभिमानी’ने गुरुवारी कोल्हापुरात निवडक कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेऊन सन्मानाने जागा सुटल्या नाहीत तर सर्वच जागा स्वबळावर लढू, असे जाहीर केले आहे.यड्रावकरांनी कोणत्याही परिस्थितीत रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे; पण ‘स्वाभिमानी’ला ही जागा सुटेल, अशी चिन्हे दिसू लागताच ‘जनसुराज्य’चे विनय कोरे यांनी यड्रावकरांची भेट घेऊन आपल्याकडे येण्याचा आग्रह धरला आहे. शिवाय नुकतेच काँग्रेस सोडून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरत असल्याची घोषणा केलेल्या प्रकाश आवाडे यांनीही यड्रावकरांसाठी दारे खुली केली आहेत. इचलकरंजीबरोबरच हातकणंगले आणि शिरोळ लढविण्याची झालेली घोषणा हा या घडामोडींचाच परिपाक आहे.दोन दिवसांत निर्णयराजू शेट्टी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांनी ते कोल्हापुरात येणार आहेत. तेव्हाच ते शिरोळमधीलच उमेदवारीचा गुंता सोडविणार आहेत. दरम्यान, आघाडीकडून फसवणूक होईल, या भीतीने कार्यकर्त्यांनी स्वबळाचा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी बुधवारी कोल्हापुरातील ‘स्वाभिमानी’च्या जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक झाली. भगवान काटे, जालंदर पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, वैभव कांबळे, अजित पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘ए. वाय.’ यांना थांबविण्याच्या हालचालीराधानगरी-भुदरगड मतदारसंघात के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याचा फैसला पुण्यात स्वत: शरद पवार उद्या, शनिवारी करणार आहेत. आगामी काळातील स्थानिक पातळीवरील निवडणुकांचे राजकारण डोळ्यांसमोर ठेवूनच या दोघांमध्ये समझोता करण्याचे प्रयत्न होणार आहेत. ए. वाय. पाटील यांना थांबण्यासाठीच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRaju Shettyराजू शेट्टीUlhas Sambhaji Patilउल्हास संभाजी पाटीलhatkanangle-acहातकणंगलेkolhapurकोल्हापूर