थकीत ऊस बिलाबाबत मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:43+5:302021-08-22T04:27:43+5:30
देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे १८ हजार ८४ कोटी रुपयांची ऊस बिले साखर कारखान्यांनी थकवली आहेत. ‘एफआरपी’च्या कायद्यानुसार ...

थकीत ऊस बिलाबाबत मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार : राजू शेट्टी
देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे १८ हजार ८४ कोटी रुपयांची ऊस बिले साखर कारखान्यांनी थकवली आहेत. ‘एफआरपी’च्या कायद्यानुसार ऊस कारखान्याकडे पाठविल्यानंतर चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. थकबाकी देण्याबाबत राज्य व केंद्र सरकारने लक्ष घालावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सर्वेाच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तीन आठवड्यांत राज्यांनी माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. अद्याप आठवडाभराचा कालावधी आहे, याबाबत राज्य सरकारला आठवण करून देणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्य सचिव व साखर आयुक्तांना पत्र लिहून आठवण करून देणार आहे. आठवण करून देऊनही राज्य सरकारने काही कार्यवाही केली नाही तर तो न्यायालयाचा अवमान होऊ शकतो, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.