शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग अदानीचे गौण खनिज गडचिरोलीतून पाठविण्यासाठीच, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:10 IST

४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्य मार्ग. मग आठवा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी

आजरा : भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समूहाचे गौण खनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून निर्यात करण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग केला जाणार आहे. भाविकांचे कारण दाखवून हा प्रकल्प जनतेच्या माथी मारला जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.शेळप (ता. आजरा) येथे झालेल्या शक्तिपीठविरोधी बैठकीत ते बोलत होते. शेळपजवळून जाणारा संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झाला आहे. या रस्त्यावर अत्यंत तुरळक वाहतूक आहे. शक्तिपीठ करून राज्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा कुटील डाव आहे.

या महामार्गाचा भार राज्यातील सामान्य जनता व वाहनधारकांच्या टोलमधून पुढील ९० वर्षांसाठी वसूल केला जाणार आहे. त्याबरोबरच या महामार्गातून ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीचा खटाटोप असल्याने सर्व थरातून विरोध होत असतानाही राज्य सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.सर्फनाला प्रकल्पासाठी शेळप गावातील ३५० एकर जमीन संपादित केली आहे. आता गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्याने बहुतांशी शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यांना पर्यायी जमीन नसल्याने शेती व्यवसायाचे नवीन संकट उभे राहत आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढ्यामध्ये शेळप ग्रामस्थांनी एकजूट करीत एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार बैठकीत केला.आता शक्तिपीठ महामार्ग कशासाठी?कोल्हापूरमधून गोव्याला जाण्यासाठी एकूण सात रस्ते असून, त्यापैकी ४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्य मार्ग आहेत. मग आठवा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी बैठकीत केला.