शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

'शेतकरी आळशी तर शेतकऱ्यांचा कारखाना घशात घालणारे रोहित पवार हुशारच', राजू शेट्टींंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 10:42 IST

Raju Shetty News: ऊस उत्‍पादक शेतकरी आळशी म्‍हणणा-या शरद पवार यांनी आतापर्यंत शेतक-यांच्‍या जीवावरच राजकारण केले आहे. रोहित पवार मात्र हुशार आळशासारखं ऊस लावत बसला नाही. त्‍याने मताची शेती करून एका झटक्‍यामध्‍ये आमदार झाला आणि दुष्‍काळ भागातील शेतक-यांनी काबाडकष्‍ट करुन उभा केलेला कारखाना घशातही घातला

कोल्हापूर - ऊस उत्‍पादक शेतकरी आळशी म्‍हणणा-या शरद पवार यांनी आतापर्यंत शेतक-यांच्‍या जीवावरच राजकारण केले आहे. रोहित पवार मात्र हुशार आळशासारखं ऊस लावत बसला नाही. त्‍याने मताची शेती करून एका झटक्‍यामध्‍ये आमदार झाला आणि दुष्‍काळ भागातील शेतक-यांनी काबाडकष्‍ट करुन उभा केलेला कारखाना घशातही घातला, असे रोहित शेतक-यांच्‍या घरात जन्‍माला यायले पाहिजे होते का, असा खोचक सवाल स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेतक-याला दिवसा वीज मिळावी, हमीभाव कायदा झाल्‍याशिवाय मी स्‍वस्‍त बसणार नाही, संपूर्ण देश ढवळून काढणार, असा इशारा स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्‍यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शेतक-यांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍यावतीने राज्‍यभर बळीराजा हुंकार यात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर रविवारी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील पहिली सभा नांदणी (ता.शिरोळ) येथील गांधी चौकात झाली. अध्‍यक्षस्‍थानी जयकुमार कोले होते.स्‍वागत सागर शंभूशेटे यांनी केले. सावकर मादनाईक म्‍हणाले, भाजप, महाविकास आघाडीने आम्‍हाला फसविले. निवडणुकीत पराभूत झालो याचे दुःख नाही. शेतक-यांचे नुकसान झाले आहे, याचे दुःख आहे.

शेट्टी म्‍हणाले, केंद्र सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणामुळेच महागार्इने शेतकरी भरडला जात आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलचा भडका उडाला आहे. यावर्षी एफआरपीमध्‍ये 75 रुपयाची वाढ मोदी सरकारने केली आहे. उतपादन खर्च प्रतिटन सव्‍वादोनशे रुपयांनी वाढला आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी सुवर्णा अपराज, राम शिंदे, सावकर मादनाईक, सचिन शिंदे, प्रकाश परीट, तानाजी वठारे, विशाल चौगुले, बसगोंडा बिराजदार, सतीश मगदूम, नंदकुमार पाटील, पापालाल शेख यांच्‍यासह स्‍वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्‍यान, नांदणी गावाने 1 लाख 91 हजार, स्‍वाभिमानी मार्ट कंपनीकडून 1 लाख, उपकारनगर जयसिंगपूर 1 लाख, जयकुमार कोले 51 हजाराचा धनादेश माजी खासदार शेट्टी यांना देण्‍यात आला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवार