आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘राजमाता जिजाऊ’ जयंती
By Admin | Updated: January 14, 2015 00:37 IST2015-01-13T20:15:03+5:302015-01-14T00:37:08+5:30
८१ वर्षांच्या श्रीमती चंपाबाई पारिसा शिरगावे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन

आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘राजमाता जिजाऊ’ जयंती
कोल्हापूर : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या थोर माता ‘जिजाऊ’ यांची जयंती रंकाळा पदपथ उद्यानात उगवत्या सूर्याच्या साक्षीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.मुलं लहान असताना पतीच्या निधनानंतर भाजी विकून आपल्या एका मुलास इलेक्ट्रिक इंजिनिअर, एकास प्राध्यापक, तर मुलीस शिक्षिका बनविणाऱ्या ८१ वर्षांच्या श्रीमती चंपाबाई पारिसा शिरगावे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.चंपाबाई यांचा सत्कार शकुंतला पाटील व यशवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी उपस्थित सर्वांना राजमाता जिजाऊंची शौर्यगाथा सांगणाऱ्या पुस्तिका सप्रेम भेट दिल्या. या कार्यक्रमास सारिका भांबुरे, उज्ज्वला कुलकर्णी, सुनीता गायकवाड, शीतल येळावकर, दीपा येळावकर व फिरोदोस मोमीन या महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन गुलमोहर ग्रुपच्यावतीने करण्यात आले. सागर नालंग यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सुधीर भांबुरे, संजय मांगलेकर, डॉ. महेश दळवी, विवेक भिडे, पवन जामदार व आनंदराव
चिखलीकर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)