लोटस केअर सेंटरला राजेश टोपे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:41+5:302021-07-18T04:17:41+5:30
कोल्हापूर : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोटस केअर सेंटला सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा उषा थाेरात ...

लोटस केअर सेंटरला राजेश टोपे यांची भेट
कोल्हापूर : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोटस केअर सेंटला सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा उषा थाेरात यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी आय. पी. डी. व ओ. पी. डी. विभागाची पाहणी केली. डॉ. किमया शहा यांनी एच. आय. व्ही. बाधित रुग्णांवर देण्यात येणाऱ्या मोफत औषधे व उपचाराची माहिती दिली. त्याचबरोबर एच. आय. व्ही. बाधित मुलांसाठी चाईल्ड ॲडॉप्शन प्रकल्पासह मुलांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पंदन कार्यक्रमाबाबतही मंत्री टोपे यांना माहीती दिली. मंत्री टोपे यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करत लोटस केअर सेंटरमध्ये कोविड लसीकरण सेंटरसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, संस्थेचे ट्रस्टी व्ही. बी. पाटील, रमाकांत भिंगार्डे, सुनील गुंडाळे आदी उपस्थित होते.
फोटो : लोटस केअर सेंटरला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. या वेळी व्ही. बी. पाटील, रमाकांत भिंगार्डे आदी उपस्थित होते. (फोटो-१७०७२०२१-कोल-लोटस हॉस्पिटल)