राजेश पाटील यांनी घेतली आंदोलक कामगारांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:10+5:302021-02-05T07:00:10+5:30
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी कामगारांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी महाबळेश्वर ...

राजेश पाटील यांनी घेतली आंदोलक कामगारांची भेट
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी कामगारांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी महाबळेश्वर चौगुले, दशरथ कुपेकर उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, सेवानिवृत्त कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. कारखान्याच्या वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे थकीत देणी मिळण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन आपण चर्चा करणार आहोत, ते नक्कीच कामगारांना न्याय देतील.
मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळेच चंदगडचा दौलत कारखाना व गडहिंग्लज साखर कारखाना सुरू राहिला आहे. आजरा कारखाना सुरू करण्यासाठीही आपले प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त कामगार संघटनेचे प्रमुख चंद्रकांत बंदी, राजेश पाटील-औरनाळकर यांच्यासह कामगार उपस्थित होते. आंदोलनाचा आज १९ वा दिसत होता.
---------------------------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज प्रांत कचेरीसमोर आंदोलन करणाऱ्या गडहिंग्लज कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांना आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाबळेश्वर चौगुले, चंद्रकांत बंदी, राजेश पाटील-औरनाळकर उपस्थित होते.
क्रमांक : ०१०२२०२१-गड-१०