शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

..तर काय बिघडले असते?, जिल्हा बँक निवडणुकीवरुन राजेश क्षीरसागरांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 17:10 IST

शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर मात्र या निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जागा वाटपातील तिडा न सुटल्याने शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर मात्र या निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे.सत्ताधाऱ्यांवर शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही या टिकेला प्रत्युत्तर दिले जात आहेत. यातच आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही प्रसिध्दी पत्रकाद्वारे सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे.जिल्हा बँकनिवडणूकीत शिवसेनेने केवळ एक जागा जादा मागितली होती. ती एक जागादेखील देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळेच जिल्हा बँकेची निवडणूक लागली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळसह इतर सहकारी संस्थांत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली आहे. जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार या लढ्यात शिवसेनेसोबत राहील आणि जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडून निघेल, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत गोकुळ प्रमाणेच महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या दृष्टीने चर्चाही सुरू होती. जिल्हा बँकेत सध्या खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी खासदार निवेदीता माने हे दोन विद्यमान संचालक आहेत. त्या वगळता आम्ही आणखी एक जादा जागा मागत होतो. गटाबाबत आमचा कोणताही आग्रह नव्हता. कोणत्याही गटातील द्या, पण शिवसेनेला आणखी एक जादा जागा हवी होती.तसा प्रस्तावही आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दिला होता. नेहमीप्रमाणे त्यावर चर्चेचे गुर्हाळ झाले. शिवसेनेचे पॅनेल होऊ शकणार नाही, असे त्यांना वाटत होते. परंतू शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व नेते एकवटले आणि पुढाकार घेऊन पॅनेलसाठी सूत्रे हलविली.शिवसेनेला जिल्हा बँकेच्या निवडणूकीत तगडे उमेदवार मिळणार नाहीत, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना वाटत होते. मात्र त्यांच्या अपेक्षांना सुरूंग लावत शिवसेनेने पॅनेल तर केलेच, त्याबरोबरच पॅनेलमधून तुल्यबळ उमेदवारही दिले आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादीने जर सुरूवातीलाच एक जागा देण्यास नकार दिला असता तर तालुक्यातील विकास सेवा संस्था गटातील बारा उमेदवारही निवडणूकीत उतरवले असते. जिल्ह्यात आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा... अशा अविर्भावात वागणार्या मंडळींना त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच वेळ आहे. या निवडणूकीत सभासदांनी शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहनी त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरShiv Senaशिवसेना