शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पालकमंत्रिपदावरुन कोल्हापुरातील शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर अस्वस्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:12 IST

आबिटकर यांना मंत्रिपद मिळाल्याने नाराजी : शिंदेसेनेसह महायुतीतही जाेरदार चर्चा

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर यांची मंत्रिपदी निवड झाल्यानंतर शिंदेसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे तीनदा आपल्याला मंत्री आणि पालकमंत्रिपद मिळाले नाही याबद्दल उघड नाराजी केल्यामुळे आबिटकर यांचे मंत्रिपद त्यांच्याच पक्षातील नेत्याला पचनी पडले नसल्याची चर्चा महायुतीसह लोकांत सुरू झाली आहे. आता रोज जाहीरपणे बोलून काहीच उपयोग नाही अशी स्थिती असताना क्षीरसागर त्यांचे दु:ख का व्यक्त करीत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.क्षीरसागर हे महाविकास आघाडीच्या काळात आणि नंतर महायुतीच्या काळात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ‘मित्रा’ या संस्थेचे ते उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. तसे आताही ते कॅबिनेट मंत्रीच आहेत. आता ते तिसऱ्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्या या महत्त्वाकांक्षेने पुन्हा उचल खाल्ली. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही त्यांनी केले. परंतु, त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांना थेट कॅबिनेटमंत्रिपद दिले.पालकमंत्रिपद म्हणजे एका अर्थाने जिल्ह्याचे नेतृत्वच त्या नेत्याकडे येते. प्रशासनात त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन असते. निधीवाटपापासून अनेक गोष्टींचा निर्णय त्यांच्या हातात असतो. त्यामुळे या वेळेला संधी असतानाही ते आपल्याला न मिळाल्याचे दु:ख क्षीरसागर यांना झाले आहे. शिवसेना फुटल्यानंतर मी सर्वांत प्रथम एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिलो, शहरात शिंदेसेनेची ताकद वाढवली. त्यामुळे नुसते मंत्रिपदच नाही, तर पालकमंत्रिपदही आपल्याला मिळायला हवे असा त्यांचा होरा होता; परंतु, तो चुकीचा ठरल्याने ते कासावीस झाल्याचे दिसत आहे.

आबिटकर यांना मंत्रिपद देताना नवे नेतृत्व, स्वच्छ चेहरा, ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार झालेला असू शकतो. फारसे राजकीय पाठबळ नसताना सलग तीनवेळा तगड्या विरोधकाला पराभूत करून ते विजयी झाले हीसुद्धा त्यांच्या कॅबिनेटसाठीची महत्त्वाची पात्रता आहे. तिसऱ्यांदा आमदार झालेले चंद्रदीप नरके यांनाही मंत्रिपदाची आशा होती; परंतु, ते मिळाले नाही म्हटल्यावर सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी काम सुरू केले. आदळआपट करीत बसलेले नाहीत. परंतु, आबिटकर यांना मंत्रिपद जाहीर होताच क्षीरसागर यांनी ‘माझाही नंबर लागला असता. मंत्रिपद मिळाले असते तर मतदारसंघासाठी चांगले झाले असते,’ अशी भाषा वापरली. मंत्री झाल्यानंतर जेव्हा आबिटकर पहिल्यांदा कोल्हापुरात आले त्या दिवशीही आपल्याला संधी मिळायला हवी होती, असे वक्तव्य क्षीरसागर यांनी केले होते. शिवाय त्यांच्या स्वागताकडेही ते फिरकले नाहीत.

पालकमंत्रिपदही खटकलेआबिटकर आणि हसन मुश्रीफ मंत्री झाल्यानंतर पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता होती. अशातच पालकमंत्रिपद आबिटकर यांना मिळाल्यानंतर रविवारी झालेल्या भोई समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी पद न मिळाल्याची ठसठस पुन्हा व्यक्त केली. वारंवार व्यक्त होणारी नाराजी आबिटकर यांना मिळालेली संधी त्यांना खूपच त्रासदायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरShiv SenaशिवसेनाPrakash abitkarप्रकाश आबिटकर